डिप्रेशनमुळे लैंगिक जीवनाला कसा बसतो फटका?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 05:07 PM2019-04-19T17:07:35+5:302019-04-19T17:09:07+5:30
डिप्रेशन आपल्या जीवनाला वेगवेगळ्या प्रकारे प्रभावित करु शकतं. पण काय तुम्हाला माहीत आहे की, याने तुमची लैंगिक क्षमता किंवा इच्छा कशाप्रकारे कमी होऊ शकते? होय हे खरंय.
(Image Credit : Vaaju)
डिप्रेशन आपल्या जीवनाला वेगवेगळ्या प्रकारे प्रभावित करु शकतं. पण काय तुम्हाला माहीत आहे की, याने तुमची लैंगिक क्षमता किंवा इच्छा कशाप्रकारे कमी होऊ शकते? होय हे खरंय. डिप्रेशनचा प्रभाव तुमच्या लैंगिक जीवनाला उद्धस्त करु शकतो. एका शोधातून समोर आलं आहे की, जर तुम्ही क्रोनिक डिप्रेशनने पीडित असाल तर तुम्हाला इरेक्टाइल डिस्फंक्शनसारखी समस्या होण्याचा धोका असतो.
सोबतच डिप्रेशनवर उपचार करण्यासाठी वापरली जाणारी औषधे सुद्धा तुमची कामेच्छा म्हणजेच लिबिडोवर नकारात्मक प्रभाव टाकू शकते. २०१८ मध्ये करण्यात आलेला आणि एसएजीईमध्ये प्रकाशित शोधासाठी १०६ जणांचा समावेश करण्यात आला होता. हे सर्व लोक विवाहित जोडपे होते. या शोधातून समोर आलं की, कपल्सपैकी एकाला किंवा दोघांनाही डिप्रेशन आहे. त्यामुळे त्यांच्या कामेच्छा कमी आढळली.
डिप्रेशनने काय होते समस्या?
जेव्हा तुम्ही डिप्रेशनमध्ये असता तेव्हा तुम्हाला असह्य आणि निराश वाटत असतं. या नकारात्मक भावना तुमच्या लैंगिक जीवनासोबतच दैनंदिन कामांनाही प्रभावित करतात. ही समस्या काही दिवस तर काही आठवडेही राहू शकते. तुमची कामेच्छा मेंदूतून उप्तन्न होत असते. ही तुमच्या शरीराला न्यरोट्रान्समीटरच्या माध्यमातून तुमच्या गुप्तांगात रक्तप्रवाह वाढवण्याचा संकेत देतो. डिप्रेशन या रसायनांना प्रभावित करतं, ज्यामुळे मेंदू योग्य तो संकेत पाठवू शकत नाही. त्यामुळे कामेच्छा कमी होते.
प्लेजरची जाणीव कमी होते
जर तुम्ही डिप्रेशनने पीडित असाल तर तुम्हाला शारीरिक संबंधासाठी मूड तयार करण्यास अडचण येते. शारीरिक संबंधावेळी ज्या गोष्टींमुळे पूर्वी तुम्ही उत्तेजित व्हायचे तसे आता काही होत नाही. याचं कारण डिप्रेशन असू शकतं. शारीरिक संबंधातून आनंदाची कमी जाणीव होणे ही सुद्धा समस्या होते.
एनर्जी लेव्हलही होते कमी
जेव्हा तुम्ही उदास किंवा तणावात असता तेव्हा तुम्ही एकतर फार जास्त वेळ झोपता किंवा तुम्हाला पुरेशी झोप मिळत नाही. कमी झोपेमुळे तुम्हाला थकवा जाणवतो. याने सुस्तीही येते. तसेच याने एनर्जी लेव्हल कमी होते आणि कामेच्छाही कमी होते. अशात लोक शारीरिक संबंध टाळण्यासाठी वेगवेगळी कारणे शोधत असतात. थकवा येत असल्याचं कारण सांगतात किंवा बरं नसल्याचं कारण सांगतात. अनेक शोधांमधून हे समोर आलं आहे की, अपुऱ्या झोपेमुळे तुमची कामेच्छा नकारात्मकपणे प्रभावित होऊ शकते.
आणखीही काही समस्या
- जर तुम्हाला वाटत असेल की, डिप्रेशनमुळे तुमची सेक्शुअल लाइफ प्रभावित होत आहे, तर यावर लक्ष देणं आताच सुरु करा. अशा स्थितीत एखाद्या सेक्सॉलॉजिस्टची भेट घ्या.
- जर तुम्हाला वाटत असेल की, डिप्रेशनमुळे तुम्ही पार्टनरसोबत चांगला वेळ घालवू शकत नाही आहात. तर सायकोथेरपीच्या माध्यमातून ही समस्या दूर करु शकता. सायकोथेरपी सेशनच्या माध्यमातून तुम्ही डिप्रेशनची लक्षणे कमी आणि मॅनेज करु शकता.
- इरेक्टाइल डिस्फंक्शन आणि ऑर्गॅंज्मचा अनुभव मिळण्यास असमर्थता हे डिप्रेशनच्या कॉमन लक्षणांपैकी एक आहे. यासाठी सेक्स थेपपिस्टची मदत घेऊ शकता. याने तुम्हाला या शारीरिक समस्यांमधून बाहेर येण्यास मदत होईल.