जाणून घ्या वयानुसार कसं बदलत जातं लैंगिक जीवन?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2019 04:58 PM2019-01-09T16:58:05+5:302019-01-09T17:01:07+5:30
आनंदी वैवाहिक जीवनासाठी लैंगिक जीवन चांगलं असणं गरजेचं आहे. पण वयाच्या वेगवेगळ्या वळणावर लैंगिक जीवनात बदल होत राहतो.
आनंदी वैवाहिक जीवनासाठी लैंगिक जीवन चांगलं असणं गरजेचं आहे. पण वयाच्या वेगवेगळ्या वळणावर लैंगिक जीवनात बदल होत राहतो. त्यातील उत्साहात कमतरता येत राहते. मग वाढतं वय असो, वाढत्या जबाबदाऱ्या असो किंवा हार्मोन्समधील बदल असो या कारणांनी हे बदल होत असतात. मात्र कोणत्या वयात कामेच्छा कमी होणे किंवा लैंगिक क्रियेतील उत्साह कमी होतो यावर कुणी फार चर्चा करत नाही. चला आज याबाबत जाणून घेऊ....
किशोरावस्था
- किशोरावस्थेत सेक्स हार्मोन्सचा स्तर फार वेगाने वाढत असतो. शारीरिक संबंधाबाबत त्यांच्यात उत्सुकताही फार जास्त असते. त्यामुळे शारीरिक संबंधाबाबत प्रयोगही याच वयात अधिक केले जातात. तसेच शारीरिक संबंधाबाबत सर्वात जास्त फॅंटसी आणि ड्रिमींगही याच वयात असते.
२० ते ३५ वयोगट
- या वयात लैंगिक संतुष्टीसाठी मनात फार उत्सुकता आणि उत्तेजना असते.
- एकमेकांना स्पर्श करणे, कुरवाळणे, चुंबन घेणे, मिठी मारणे आणि यानंतरच लैंगिक क्रिया असते असं मानलं जातं.
- तरुण मुलं नेहमीच वेगवेगळ्या स्पनांमध्ये आणि फॅंटसीच्या विश्वात रमलेले असतात.
- तरुण मंडळी शारीरिक संबंधाबाबत चर्चाही खूप करतात. कारण त्यांच्यात याबाबत वेगवेगळी जिज्ञासा आणि उत्सुकता असते.
- पण या वयातील तरुणी त्यांच्या मनातील इच्छा व्यक्त न करतात मनातच रोखून ठेवतात. त्यांना वाटत असतं की, पार्टनरने स्वत:हून समजून घ्यावं. जर जोडीदाराने ते समजून घेतलं नाही तर त्या विचार करतात की, ते जास्त संवेदनशील नाहीत. या कारणाने त्यांच्यात तणाव आणि डिप्रेशन वाढू लागतं.
- सामान्यपणे या वयात तरुणींमध्ये शारीरिक संबंध ठेवण्याची तीव्र इच्छा होते, पण त्या जोडीदारा आपल्या मनातील गोष्ट सांगण्यात लाजतात.
३५ ते ५० वयोगट
- काही पुरुष आणि महिला जेव्हा ३५ वयापर्यंत पोहोचतात, तेव्हा त्यांचा शारीरिक संबंधातील रस कमी होऊ लागतो.
- असं नाही की, त्यांच्यातील कामेच्छा कमी होते, पण हा बदल शारीरिक स्तरावरुन उठून भावनात्मक आणि समजदारीकडे झुकू लागतो.
- दोघांचीही पहिली गरज ही असते की, एकमेकांशी भावनात्मक आणि बौद्धीक स्तरावर जुळावं. तेव्हाच ते एकमेकांच्या लैंगिक इच्छांना समजू शकतात.
- ३५ वयात शारीरिक संबंधाची फ्रीक्वेंसी २० वयाच्या तुलनेत कमी होते. पण शारीरिक संबंधाच्या क्वालिटीमध्ये या वयात वाढ होते. कारण दोघेही परिपक्व झालेले असतात.
- एका सर्वेनुसार, चाळीस किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या महिला शारीरिक संबंध जास्त एन्जॉय करतात. या वयात येईपर्यंत दोघांनाही हे कळालेलं असतं की, कशाप्रकारे आनंद द्यायचा आहे. कुणाला काय आवडतं. त्यामुळे या वयातील शारीरिक संबंध अधिक संतुष्टी देणारं असतं.
- महिलांमध्ये हार्मोनल बदल याच वयात अधिक होतात. मोनोपॉजच्या खूप जवळ असल्या कारणाने त्यांच्या मूडमध्येही बदल होतात. आरोग्यासंबंधी समस्या लैंगिक जीवनाला प्रभावित करतात.
५० वयानंतर
- ५० वय झाल्यानंतर जास्तीत जास्त महिला आणि पुरुष शारीरिक संबंधाबाबत बोलण्यास धजत नाहीत. त्यांना वाटत असतं की, त्यांचं वय शारीरिक संबंध एन्जॉय करण्याचं किंवा यावर बोलण्याचं नाहीये. कारण ते आता सासु-सासरे, आजी-आजोबा झाले आहेत.
- या वयात आधीसारखी एनर्जी, जोश न राहिल्याने आणि योग्य प्रकारे शारीरिक संबंध ठेवू न शकल्यानेही त्यांच्या मनात भीती निर्माण होते. अशावेळी ते यापासून दूर राहणेच योग्य समजतात.