आठवड्यातून कितीवेळा शारीरिक संबंध ठेवणं गरजेचं?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2018 04:15 PM2018-12-14T16:15:57+5:302018-12-14T16:17:05+5:30
अनेकदा तुम्ही हे अनेकांकडून ऐकलं असेल की, नियमीतपणे शारीरिक संबंध ठेवण्याचे किती फायदे होतात. तज्ज्ञांच्या मते चांगलं आरोग्य आणि शारीरिक संबंध याच्यात खोलवर संबंध आहे.
अनेकदा तुम्ही हे अनेकांकडून ऐकलं असेल की, नियमीतपणे शारीरिक संबंध ठेवण्याचे किती फायदे होतात. तज्ज्ञांच्या मते चांगलं आरोग्य आणि शारीरिक संबंध याच्यात खोलवर संबंध आहे. कारण नियमीतपणे शारीरिक संबंध ठेवल्याने तुमचं वजन नियंत्रणात राहतं. तसेच ब्रेस्ट कॅन्सर आणि प्रोस्टेट कॅन्सरचाही धोका कमी होऊ शकतो. तसेच चांगल्या लैंगिक जीवनामुळे हृदयरोग आणि तणाव यांचाही धोका कमी होतो. पण अनेकांना चांगलं लैंगिक जीवन म्हणजे आठवड्यातून कितीदा शारीरिक संबंध ठेवावे, हे माहीत नसतं. याबाबत ते नेहमीच संभ्रम असतात. चला जाणून घेऊ या प्रश्नाचं उत्तर...
काय सांगतो रिसर्च?
आर्काइव्स ऑफ सेक्सुअल बिहेविअरमध्ये प्रकाशित एका रिसर्चने दावा केला आहे की, अमेरिकेतील लोक आता तेवढे शारीरिक संबंध ठेवत नाहीत, जितके ते १० वर्षांपूर्वी ठेवत होते. २००० ते २००४ दरम्यान अमेरिकेचे लोग जितके शारीरिक संबंध ठेवत होते, त्या तुलनेत २०१० ते २०१४ दरम्यान अमेरिकेचे लोक ९ पटीने कमी शारीरिक संबंध ठेवले. लग्न झालेल्या जोडप्यांमध्ये ही आकडेवारी कमी होती. कारण त्यांनी दरवर्षी १६ वेळा शारीरिक संबंध कमी ठेवले.
काय आहे कामेच्छा कमी असण्याची कारणं?
वेगवेगळ्या रिसर्चनुसार, कामाचे वाढते तास आणि ताण, वाढत्या जबाबदाऱ्या यामुळे लोकांमध्ये कामेच्छा कमी बघायला मिळत आहे. तसेच इंटरनेट आणि मनोरंजनाची दुसरी साधने उपलब्ध झाल्याने लोक त्यावर जास्त वेळ घालवतात. याचा अर्थ हा नाही की, शारीरिक संबंधाबाबत नकारात्मकता आली आहे. एका सरसरी वयस्क जोडपं १ वर्षात ५४ वेळा शारीरिक संबंध ठेवतात. हे आठवड्यातून १ वेळा शारीरिक संबंध ठेवण्यापेक्षा जास्त आहे.
फ्रीक्वेंसीपेक्षा आनंद महत्त्वाचा
तुम्ही जर तुमच्या पार्टनरसोबत संतुष्ट असाल तर तुम्ही किती वेळा शारीरिक संबंध ठेवता, या गोष्टीने काहीही फरक पडत नाही. कॅनडातील यॉर्क यूनिव्हर्सिटीच्या एका रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, आनंदी राहण्यासाठी आठवड्यातून एकदा शारीरिक संबंध ठेवणेही पुरेसं आहे. पण तज्ज्ञ असंही सांगतात की, पूर्णपणे संतुष्टी मिळवण्यासाठी आठवड्यातून एकापेक्षा जास्त वेळ शारीरिक संबंध ठेवावे.
रोज शारीरिक संबंधाचे फायदे
एका शोधातून हे समोर आलं आहे की, महिन्यातून एकदा शारीरिक संबंध ठेवणाऱ्या पुरुषांच्या तुलनेत आठवड्यातून दोनदा शारीरिक संबंध ठेवणाऱ्यांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी होतो. तसेच नियमीत शारीरिक संबंध ठेवल्याने इम्यूनिटी वाढवणाऱ्या अॅंटीबॉडीचं शरीरात प्रमाण वाढतं होतं. याने आपल्याला सर्दी आणि ताप सारख्या समस्यांशी लढण्याची ताकद मिळते.