लैंगिक जीवन : पहिल्यांदा शारीरिक संबंधाचा अर्थ पुरूष आणि महिलांसाठी वेगवेगळा!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2019 02:50 PM2019-10-26T14:50:15+5:302019-10-26T14:51:57+5:30
पहिल्यांदा शारीरिक संबंध ठेवण्याचा अनुभव हा प्रत्येकासाठी फार वेगळा असतो. काही लोकांसाठी फार विचित्र असतो, तर काही लोकांसाठी फारच आनंददायी.
(Image Credit : goodmenproject.com)
पहिल्यांदा शारीरिक संबंध ठेवण्याचा अनुभव हा प्रत्येकासाठी फार वेगळा असतो. काही लोकांसाठी फार विचित्र असतो, तर काही लोकांसाठी फारच आनंददायी. पण यात एक प्रश्न नेहमीच विचारला जातो की, महिला आणि पुरूषांचा पहिल्यांदा शारीरिक संबंध ठेवण्याचा अनुभव एकसारखा असतो का?
महिलांसाठी कसा असतो हा पहिला अनुभव
या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी जगभरात वेगवेगळे रिसर्च केले गेले. तसेच याबाबत अनेक गैरसमज आणि कन्फ्यूजनही आहेत. याचबाबत एक सर्वात कॉमन विचार जास्तीत जास्त लोकांच्या मनात असतो, तो म्हणजे महिलांसाठी पहिल्यांदा शारीरिक संबंध ठेवणे म्हणजे त्रासदायक आणि वेदनादायी असतं. सोबतच ज्या पुरूषांसोबत महिला पहिल्यांदा शारीरिक संबंध ठेवतात, त्या व्यक्तीसोबतच त्या आयुष्यभर राहतात आणि त्यांच्या सोबतच त्यांची अटॅचमेंट असते. तसेच लग्नाआधी व्हर्जिनिटी गमावणाऱ्या महिलांना समाज वेगळ्या नजरेने बघतो. हे सगळे विचार आणि भावना महिलांप्रति केला जाणार पक्षपात दर्शवतात.
महिलांचं स्वत:प्रति आकर्षण कमी होतं
तेच दुसरीकडे पेन्सिल्वेनिया स्टेट युनिव्हर्सिटीच्या एका रिपोर्टमध्ये हे समोर आलं आहे की, पहिल्यांदा शारीरिक संबंध ठेवल्यानंतर महिला आणि पुरूषांची फीलिंग्स पूर्णपणे वेगळी असते. पहिल्यांदा शारीरिक संबंध ठेवल्यानंतर पुरूषांमध्ये अधिक आत्मविश्वास येतो आणि त्यांना संतुष्ट झाल्याची जाणीव होते. तेच महिलांच्या याबाबत्या फीलिंग्स पूर्णपणे उलट असतात.
४३४ कॉलेज विद्यार्थ्यांना या रिसर्चमध्ये सहभागी करून घेण्यात आले होते. त्यातून समोर आलं की, पहिल्यांदा शारीरिक संबंध ठेवल्यानंतर महिलांना स्वत:प्रति आकर्षण कमी जाणवू लागतं. तेच पहिल्यांदा शारीरिक संबंध ठेवल्यानंतर पुरूषांना अधिक उत्तेजना जाणवते.
पुरूषांना काही गमावण्याची भावना नसते
या रिपोर्टमधून असंही समोर येतं की, आपला समाज शारीरिक संबंध आणि व्हर्जिनिटीबाबत महिला आणि पुरूषांना कसा बघतो. पेन्सिल्वेनिया युनिव्हर्सिटीच्या सहायक प्राध्यापिका ईवा लेफ्कोविट्ज सांगतात की, सरासरी तरूणींना पहिल्यांदा शारीरिक संबंध ठेवल्यानंतर स्वत:बाबत अधिक वाईट वाटू लागतं. पण पुरूषांमध्ये पहिल्यांदा शारीरिक संबंध ठेवल्यावर काही गमावल्याची कोणतीच भावना नसते. सोबतच पुरूषांना त्यांच्या पार्टनरबाबत प्रेम जाणवावं असंही गरजेचं नाही.