लैंगिक जीवन : इंडियन व्हायग्राचे साइड इफेक्ट्स माहीत नसतील तर होतील वांदे!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2020 05:05 PM2020-02-05T17:05:21+5:302020-02-05T17:05:57+5:30

शिलाजीत किंवा कोणत्याही एखाद्या नैसर्गिक औषधाचं सेवन करताना त्याच्या प्रमाणावर लक्ष ठेवणं गरजेचं असतं.

Indian viagra or shilajit side effects | लैंगिक जीवन : इंडियन व्हायग्राचे साइड इफेक्ट्स माहीत नसतील तर होतील वांदे!

लैंगिक जीवन : इंडियन व्हायग्राचे साइड इफेक्ट्स माहीत नसतील तर होतील वांदे!

googlenewsNext

लैंगिक समस्या सोडवण्यासाठी शिलाजीत सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. कारण यात वेगवेगळ्या लैंगिक समस्या दूर करण्याची क्षमता आहे. त्यामुळेच लोक नैसर्गिक पद्धतीने त्यांच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करत असतात. पण शिलाजीतचे जेवढे फायदे आहेत, तेवढेच काही नुकसानही आहेत. 

शिलाजीत किंवा कोणत्याही एखाद्या नैसर्गिक औषधाचं सेवन करताना त्याच्या प्रमाणावर लक्ष ठेवणं गरजेचं असतं. अनेक लोक ही औषधे सेवन करताना कमी किंवा जास्त प्रमाणात घेतात. हीच ती चूक आहे जेव्हा लोकांना या औषधांचा फायदा होण्याऐवजी त्यापासून नुकसान होतं. अनेकजण लवकर आणि अधिक फायद्यासाठी जास्त प्रमाणात याचं सेवन करतात. त्यांनाही याच्या अनेक साइड इफेक्ट्सचा सामना करावा लागतो.

शरीराचं तापमान वाढतं

इंडियन व्हायग्रा किंवा शिलाजीतच्या सेवनाने सर्वात पहिलं होणारं नुकसान म्हणजे शरीराचं तापमान वाढतं. गरमीमुळे हात-पाय आणि पोटात जड वाटू लागतं. तापमान संतुलित राहत नसल्याने मूड बिघडणे आणि डोकेदुखीची समस्याही होऊ लागते.

तळपाय आणि तळहातांची जळजळ

तळपाय आणि तळहातांमध्ये अधिक जळजळ आणि गरमी जाणवू लागते. ही समस्या शिलाजीतच्या अधिक सेवनामुळे होते. त्यामुळे कधीही याचं सेवन तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावं.

अ‍ॅलर्जिक रिअ‍ॅक्शन

गरमी आणि अ‍ॅलर्जीमुळे त्वचेवर फोड, पुरळ, रॅशेज आणि इरिटेशनसारख्या समस्याही इंडिनय व्हायग्रामुळे होऊ लागतात. त्यासोबतच शिलाजीतच्या सेवनामुळे उलटी होणे, अस्वस्थ वाटणे आणि हार्ट बीट वाढणे अशाही समस्या होतात.

जास्त लघवी लागणे

शिलाजीतच्या अधिक सेवनामुळे तुम्हाला पुन्हा पुन्हा लघवीला जाण्याची समस्या देखील होऊ शकते.

Web Title: Indian viagra or shilajit side effects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.