लैंगिक जीवन : पुरूषांना प्रायव्हेट पार्टमध्ये इचिंग होण्याची कारणे!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2020 03:41 PM2020-02-07T15:41:12+5:302020-02-07T15:52:32+5:30
हे सेक्शुअल ट्रान्समिटेड डिजीजचं पहिलं लक्षण असतं. यात रॅशेज, त्वचा लाल होणे, खाज येणे आणि जळजळ होणे अशा समस्या होतात.
पुरूषांना अनेकदा प्रायव्हेट पार्टमध्ये इचिंग म्हणजेच खास येण्याची समस्या होते. हे सेक्शुअल ट्रान्समिटेड डिजीजचं पहिलं लक्षण असतं. यात रॅशेज, त्वचा लाल होणे, खाज येणे आणि जळजळ होणे अशा समस्या होतात. पण अनेकदा सेक्शुअली अॅक्टिव नसेल किंवा प्रोटेक्शनचा वापर करत असतील अशाही पुरूषांना इचिंगची समस्या होऊ लागते. याची वेगवेगळी कारणे असू शकतात. आज याच कारणांबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
स्कॅबिज
प्रायव्हेट पार्टमध्ये खाज येण्याच्या प्रमुख कारणांपैकी एक स्कॅबिज आहे. हे एक स्कीन इन्फेक्शन असून वेगाने पसरतं. पण हे एक सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन नाहीये. यात खाज येण्यासोबतच फोड आणि पुरळही येते.
यूटीआय
लघवी करताना त्रास होणे आणि प्रायव्हेट पार्टवर खाज येण्याची समस्या होत असेल तर यूरीनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनचा संकेत असू शकतो. यूरीनरी ट्रॅक्टमध्ये बॅक्टेरिया शिरल्याने खाज आणि लघवी करताना वेदना होतात.
डायबिटीस
हाय ब्लड शुगर लेव्हलमुळेही जेनाइटल एरियात इचिंग होऊ लागते. त्यामुळे असं काही होत असेल तर डायबिटीक्स आणि नॉन-डायबिटीक्सने ब्लड शुगरची लेव्हल चेक करावी.
काय कराल उपाय?
जेव्हा प्रायव्हेट पार्टमध्ये इचिंग होत असेल तर आधी तुमचे टॉयलेट प्रॉडक्ट चेक करा. ज्यांची स्कीन संवेदनशील असते त्यांनी सुगंधी साबणं वापरू नये. त्यांनी एखादं माइल्ड साबण वापरावं.
कंडोमचा ब्रॅन्ड बदला
अल्कोहोल बेस्ड कंडोममुळेही प्रायव्हेट पार्टमध्ये खाज येऊ शकते. जर तुम्ही लेटेक्स किंवा अल्कोहोल असलेले कंडोम वापरत असाल तर त्यांचा वापर बंद करा.
हस्तमैथुन करू नका
अनेकांना पुन्हा पुन्हा हस्तमैथुन करण्याची सवय असते. यामुळेही स्कीन इरिटेशनची समस्या होऊ लागते. अशात हस्तमैथुन काही दिवस बंद करा.
अंडरवेअर
प्रायव्हेट पार्टमध्ये खाज येण्याचं मुख्य कारण अंडरवेअरही असू शकतं. याने प्रायव्हेट पार्टच्या भागात बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता असते. त्यामुळेही इचिंगची समस्या होते. अशात काही दिवस अंडरवेअर वापरू नका किंवा चांगल्या क्वालिटीची अंडरवेअर वापरा.