लैंगिक जीवन : तुमच्यासोबतही शारिरीक संबंधानंतर 'असं' होतं असेल तर घेऊ नका टेन्शन...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2019 03:44 PM2019-09-09T15:44:38+5:302019-09-09T15:45:43+5:30
शारीरिक संबंधानंतर अनेकदा अशी काही स्थिती निर्माण होते की, लोक चिंतेत पडतात. चला जाणून घेऊ अशाच काही गोष्टींबाबत ज्यांची फार चिंता करण्याची गरज नाही.
(Image Credit : astropsychicreading.com)
शारीरिक संबंध एक असा विषय आहे ज्यावर आजही लोक मोकळेपणाने बोलत नाहीत आणि योग्य माहिती नसल्याने लोक वेगवेगळे गैरसमजही बाळगून असतात. मुळात हा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की, शारीरिक संबंध ही केवळ शरीराची गरज नसून याने तुम्ही पार्टनरसोबत भावनात्मक रूपानेही जोडले जातात. शारीरिक संबंधानंतर अनेकदा अशी काही स्थिती निर्माण होते की, लोक चिंतेत पडतात. चला जाणून घेऊ अशाच काही गोष्टींबाबत ज्यांची फार चिंता करण्याची गरज नाही.
महिलांना सीमेन लीक झाल्याची जाणवणं
जर तुमच्या पार्टनरने कंडोमचा वापर केला नसेल तर इंटरकोर्सनंतर महिलांना वाटू शकतं की, सीमेन लीक होत आहे. सीमेन व्हजायनामधून डिस्चार्ज झाल्यावर थोड्या प्रमाणात बाहेर येणं सामान्य बाब आहे. जर तुम्हाला हे योग्य वाटत नसेल तर लगेच स्वच्छ करा.
प्रायव्हेट पार्टमध्ये इचिंग होणे
प्रायव्हेट पार्ट फार संवेदनशील असतात. इंटरकोर्स दरम्यान फ्रिक्शनमुळे किंवा लुब्रिकंट किंवा कंडोमची अॅलर्जी असल्याने इचिंग होऊ शकते. कधी-कधी स्कीनवर लाल चट्टेही दिसू लागतात. अशात जास्तीत जास्त वेळा ही समस्या आपोआप ठीक होते. पण समस्या जास्त असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
शरीरावर पॅचेज दिसणे
अनेकदा शारीरिक संबंधानंतर छातीवर, चेहऱ्यावर किंवा इतरही भागात लाल किंवा निळे पॅच दिसू लागतात. हे पॅच ऑर्गॅज्मनंतर दिसतात, कारण शारीरिक संबंधावेळी शरीर उत्तेजित होतं. अशात ब्लड फ्लो वाढतो. जेव्हा शरीर सामान्य स्थितीत येतं तेव्हा हे पॅचेज दिसू शकतात. पण हे थोड्या वेळाने ठीक होतात.
झोप येणे
शारीरिक संबंधानंतर झोप येणे सामान्य बाब आहे. संपूर्ण दिवसाच्या थकव्यानंतर ऑर्गॅज्मने जे न्यूरोकेमिकल्स निघतात ते झोपेसाठी जबाबदार असतात. एक्साइटमेंट दरम्यान शरीरातून इंडॉर्फिन रिलीज होतात, जे नॅच्युरल पेनकिलर असतात. शरीर रिलॅक्स होताच झोप येऊ लागते.