लैंगिक जीवन : लुब्रिकंट्स महत्त्वाचं की नाही?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 03:52 PM2019-04-05T15:52:36+5:302019-04-05T15:53:05+5:30
काही लोक शारीरिक संबंधारम्यान लुब्रिकंट्सचा वापर करतात, तर काही लोक अशा गोष्टींचा अजिबातच वापर करत नाहीत.
(Image Credit : Java)
काही लोक शारीरिक संबंधादरम्यान लुब्रिकंट्सचा वापर करतात, तर काही लोक अशा गोष्टींचा अजिबातच वापर करत नाहीत. गुप्तांगाच्या लवचिकतेसाठी या लुब्रिकंट्सचा वापर केला जातो. अनेकदा असं आढळलं आहे की, गुप्तांगामध्ये ओलावा नसल्याने महिला आणि पुरूष दोघांच्याही गुप्तांगाला घर्षणामुळे गंभीर इजा होऊ शकते.
कपल्समध्ये जेवढं शारीरिक संबंधाचं महत्त्व आहे तितकंच सेक्शुअली हेल्दी असंही आहेच. पण काही महिला त्यांच्या लैंगिक आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. यामुळे त्यांच्या गुप्तांगामध्ये ड्रायनेस म्हणजेच कोरडेपणा येतो. यामुळे शारीरिक संबंध ठेवताना वेदना होतात आणि जखम होण्याचाही धोका असतो. त्यामुळे तज्ज्ञ लुब्रिकंट्स वापरण्याचा सल्ला देतात.
लुब्रिकंट्सचं महत्त्व
एखाद्या महिलेमध्ये जेव्हा उत्तेजना जागृत होते, तेव्हा त्यांच्या गुप्तांगामध्ये नॅच्युरल लुब्रिकेशन म्हणजेच ओलावा येतो. या लुब्रिकेशनच्या मदतीने शारीरिक संबंध योग्यप्रकारे ठेवता येतात. लुब्रिकेशनविना इंटरकोर्स केल्याने वेदना होऊ शकतात आणि वजायनल लायनिंगही डॅमेज होऊ शकतात. त्यामुळे शारीरिक संबंधादरम्यान लुब्रिकंट्सचा वापर करणे गरजेचा असल्याचं सांगितलं जातं.
वजायनल लुब्रिकंट्स आणि त्यांचे प्रकार
१) सर्वातआधी तर हे जाणून घ्या की, लुब्रिकंट्सचा वापर कुणीही करू शकतं. मग नॅच्युरल लुब्रिकेशन असो अथवा नसो. पण जर तुम्ही वजायनल ड्रायनेसचे शिकार झाले असाल तर लुब्रिकंट तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं.
२) काही लुब्रिकंट असे असतात जे सेक्शुअल फंक्शनला अधिक वाढवतात आणि उत्तेजनाही वाढवतात.
३) प्रत्येक व्यक्तीच्या शारीरिक संबंधाच्या गरजा वेगळ्या असतात, त्यामुळे या गरजांनुसार बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे लुब्रिकंट्स उपलब्ध असतात.
वॉटर बेस्ड लुब्रिकंट
हे सर्वात कॉमन लुब्रिकंट आहे जे दोन व्हेरायटीमध्ये मिळतं. एकात ग्लिसरीन असतं आणि टेस्टला थोडं गोड असतं. तर दुसरं ग्लिसरीन नसलेलं असतं. याचा फायदा हा आहे की, याचा वापर तुम्ही कंडोमसोबत सहजपणे करु शकता. तसेच हे सुरक्षितही असतं.
सिलिकन बेस्ड लुब्रिकंट्स
हे पसरणारं आणि चिकट असतं. याला कोणत्या प्रकारचं गंधही नसतो. हे सर्वात चांगलं लब्रिकंट असल्याचं सांगितलं जातं. कारण हे लुब्रिकंट जास्त वेळ चालतं. हे लब्रिकंट लेटेक्स कंडोमसोबत वापरायला हवं. याची आणखी एक खायियत म्हणजे तुम्ही जर शॉवर सेक्स करत असाल तर हे जास्त वेळ टिकतं.
ऑइल बेस्ड लुब्रिकंट्स
हे दोन प्रकारचे असतात एक नैसर्गिक आणि एक सिंथेटिक. नॅच्युरल ऑइल बेस्ड लुब्रिकंट्स खोबऱ्याचं तेल किंवा बटरपासून तयार केलेले असतात. तर सिंथेटिक हे मिनरल ऑइल किंवा व्हॅसलीनपासून तयार करतात. हे स्वस्त असतं आणि सुरक्षित असतं.
या गोष्टींची घ्या काळजी
१) जर तुम्हाला वजायनल ड्रायनेसची समस्या असेल तर ग्लिसरीन असलेल्या लुब्रिकंट्सचा वापर करू नका. हे लुब्रिकंट लवकर कोरडं होतं. अशावेळी सिलिकन बेस्ड लुब्रिकंटचा वापर करावा.
२) जर तुम्हाला यीस्ट इन्फेक्शन झालं असेल तर ग्लिसरीन युक्त लब्रिकंटपासून दूर रहा. यामुळे वजायनामध्ये इरिटेशन आणि कोरडेपणा होऊ शकतो. तसेच याचे चांगले बॅक्टेरियाही नष्ट होऊ शकतात.
३) कंडोमचा वापर करणार असाल तर ऑइल बेस्ड लुब्रिकंट्सचा वापर कोणत्याही स्थितीत करू नका. कारण याने लेटेक्स कंडोम लवकर खराब करतं.
४) शॉवर सेक्स दरम्यान सिलिकन बेस्ड लुब्रिकंटचा वापर करू नका.
लुब्रिकंट्सचे साइड इफेक्ट्स
लुब्रिकंट्सचे फार साइड इफेक्ट नसल्याचं तज्ज्ञ सांगतात. पण लुब्रिकंट्समध्ये अॅलर्जी होईल असं एखादं तत्व असू शकतं.
(टिप - या लेखात सुचवण्यात आलेल्या टिप्स आणि सल्ले केवळ तुमच्या माहितीसाठी आहेत. याकडे तुम्ही प्रोफेशनल सल्ला या रूपाने बघू शकत नाहीत. कोणत्याही प्रकारचं प्रॉडक्ट वापरण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा.)