लैंगिक जीवन : हस्तमैथुन करणाऱ्यांना 'हे' माहीत असलेच पाहिजे!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2019 05:04 PM2019-06-04T17:04:36+5:302019-06-04T17:07:50+5:30
हस्तमैथुनाबाबत लोकांमध्ये अनेकप्रकारचे गैरसमज असतात. अनेक लोक याला चुकीचं मानतात तर काही लोक याला योग्य मानतात.
(Image Credit : Medical News Today)
हस्तमैथुनाबाबत लोकांमध्ये अनेकप्रकारचे गैरसमज असतात. अनेक लोक याला चुकीचं मानतात तर काही लोक याला योग्य मानतात. पण विज्ञान याला चुकीचं मानत नाही. हस्तमैथुन आरोग्यासाठी चांगलं आणि सामान्य मानण्यात आलं आहे. हस्तमैथुन करताना काही खास गोष्टींची काळजी घेऊ शकता. त्या काय आहेत हे जाणून घेण्याआधी हस्तमैथुनाबाबत काही गैरसमज दूर करून घेऊयात.
स्वत:ला आनंद मिळवून देण्यासाठी आपल्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श केला जातो, त्याला हस्तमैथुन मानलं जातं. प्रत्येक व्यक्ती हे वेगवेगळ्या प्रकारे करतात. हस्तमैथुन करताना व्यक्ती त्याच्या डोक्यातील सुंदर क्षणांची कल्पना करतो. आणि वीर्यला मोकळी वाट करून देतो.
हे चुकीचं आहे का?
अजिबात नाही. हा स्वत:ला आनंद मिळवून देण्याचा एक नैसर्गिक प्रकार आहे. याने तुम्ही स्वत:ला लैंगिक सुख मिळवून देत असता. याला फार खाजगी मानलं जातं. सार्वजनिक ठिकाणांवर असं काही करू नये कारण असं करणं कायदेशीररित्या गुन्हा आहे. हस्तमैथुन मुलं आणि मुली दोघेही करतात. मुलांमध्ये १७ वयानंतर हस्तमैथुनाची इच्छा वाढू लागते. पण काही मुलांना असं काही करावं वाटत नाही. हस्तमैथुनाची इच्छा होईल तेव्हा त्यांनी असं काही करावं.
आरोग्यासाठी हानिकारक?
नाही. हस्तमैथुनामुळे तुम्ही अंध किंवा वेडे होत नाहीत. तसेच हस्तमैथुन केल्याने डोळ्याखाली डार्क सर्कलही होत नाहीत. तसेच शारीरिक विकासही रोखला जात नाही. वास्तविकता ही आहे की, हस्तमैथुन केल्याने तुमचा तणाव कमी होतो आणि शरीराला आनंद देणारे इन्डॉर्फिन हार्मोस रिलीज होतात. याने तुम्हाला रिलॅक्स वाटतं.
मुलींनी घ्यावी ही काळजी
मुली हस्तमैथुन करताना गुप्तांगामध्ये काही वस्तुंचा वापर करतात. हे सेक्स टॉय सुद्धा असू शकतात. पण असं करणं तोपर्यंत सुरक्षित आहे जोपर्यंत तुम्हाला कोणत्या प्रकारचा त्रास होत नाही. पण त्या वस्तुच्या माध्यमातून बॅक्टेरिया आत जाऊ नये याची काळजीही घ्यावी. कारण असं झालं तर तुम्हाला वेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
तज्ज्ञ काय सांगतात?
सेक्सॉलॉजिस्ट डॉ. राजन भोसले यांनी सांगितले की, ‘‘भर तारुण्यात वेळोवेळी उफाळून येणाऱ्या कामवासनेला वाट मोकळी करून देण्यासाठी हस्तमैथुनाचा सुरक्षित मार्ग अवलंबणं गरजेचं असतं. दाटलेल्या लैंगिक उत्तेजनेला मोकळी वाट करून देण्यास जर आपण मज्जाव केला तर तेसुद्धा अनेक प्रकारे शारीरिक व मानसिकदृष्टय़ा घातक ठरू शकतं.’’