लैंगिक जीवन : कमी की जास्त, काय महत्त्वाचं?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 04:54 PM2018-11-19T16:54:20+5:302018-11-19T16:55:15+5:30

अनेकदा नवीन कपल्समध्ये हा प्रश्न बघायला मिळतो की, त्यांनी कितीवेळा शारीरिक संबंध ठेवायला हवेत. पण शारीरिक संबंधाबाबत लोकांमध्ये वेगवेगळ्या धारणा बघायला मिळतात.

Know how much sex is good for health | लैंगिक जीवन : कमी की जास्त, काय महत्त्वाचं?

लैंगिक जीवन : कमी की जास्त, काय महत्त्वाचं?

Next

अनेकदा नवीन कपल्समध्ये हा प्रश्न बघायला मिळतो की, त्यांनी कितीवेळा शारीरिक संबंध ठेवायला हवेत. पण शारीरिक संबंधाबाबत लोकांमध्ये वेगवेगळ्या धारणा बघायला मिळतात. काही या गोष्टींना खरं मानतात तर काही चुकीचं. केवळ इतकच नाही तर लैंगिक जीवनाबाबत महिला आणि पुरुषांचे अनुभव वेगवेगळे असतात. अशाच काही गोष्टींबाबत खालील महत्त्वाच्या गोष्टी ज्याबाबत संभ्रमता असते. 

जास्त उत्साह

सुरुवातीला अनेक नवीन कपल्सना शारीरिक संबंधांबाबत फार जास्त उत्सुकता असते. सोबतच अनुभवाची कमतरता असल्याने त्यांना वेदनाही भरपूर होतात. काही त्यामुळे शारीरिक संबंध टाळतात तर काही पुन्हा पुन्हा शारीरिक संबंध ठेवतात. कमी किंवा जास्त दोन्ही प्रकारे शारीरिक संबंधाची क्रिया आरोग्यावर प्रभाव करते. 

भावनिक जवळीकता

शारीरिक संबंध केवळ शारीरिक गरज नाहीये, तर ही दोन व्यक्तींमध्ये भावनिक जवळीकता वाढवतं. शारीरिक संबंध ही क्रिया दोन व्यक्तींच्या भावनिक गरजा समजून घेण्याचीही क्रिया आहे. एका अभ्यासानुसार, जे लोक भावनिक समानतेला मानतात ते लैंगिक जीवन अधिक जास्त एन्जॉय करु शकतात. 

आराम मिळतो

शारीरिक संबंधादरम्यान हॅपी हार्मोन्स रिलीज होतात. यामुळे जास्त वेळा शारीरिक संबंध ठेवल्याने जास्त आनंद मिळतो. तज्ज्ञांनुसार, जे लोक जास्तवेळा शारीरिक संबंध ठेवतात, ते कमी भावनिक समस्यांना बळी पडतात. त्यांना एकटेपणाही कमी जाणवतो आणि रागही कमी येतो. तसेच पती-पत्नीमध्ये यामुळे नातं आणखी मजबूत होतं. कारण या जोडीदारांमध्ये भांडणं कमी होतात. 

इन्फेक्शनचा धोका

गरजेचं नाहीये की, शारीरिक संबंधातून तुम्हाला फायदाच होईल, याने तुम्हाला काही नुकसानही होतात. शारीरिक संबंधातून महिलांना यूटीआयची समस्या होते. तज्ज्ञांनुसार, शारीरिक संबंध ठेवणाऱ्या महिलांना कधी ना कधी यूटीआय समस्येचा सामना करावा लागतो. गुप्तांगातील हा वायरस शारीरिक संबंधानंतर सहज महिलांच्या मूत्राशयात जातात. 

पुन्हा पुन्हा लघवीला जाणे

महिलांमध्ये ही समस्या सामान्य आहे. लघवीला जाऊन आल्यावरही त्यांना पुन्हा लघवीचा जाण्याची इच्छा होते. याचं कारण जी-स्पॉटमधील सूज असू शकते. या भागात शारीरिक संबंधादरम्यान सूज येते. याने मूत्राशयावर दबाव येतो आणि त्यांना वाटतं की, मूत्राशय भरलेलं आहे.  
 

Web Title: Know how much sex is good for health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.