लैंगिक जीवन : सकाळी-सकाळीच जास्त का उत्तेजित होतात पुरूष? जाणून घ्या कारण....
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 04:33 PM2019-10-23T16:33:31+5:302019-10-23T16:34:43+5:30
साधारणपणे पुरूष सकाळच्या वेळी जास्त एक्सायटेड असतात. तर महिला झोपण्याआधी. असं का होतं तर याचं साधं उत्तर म्हणजे हार्मोन्समुळे. चला जाणून घेऊ सेक्स क्लॉक कसं काम करते.
(Image Credit : urjakit.com)
अनेकदा असं बघायला मिळतं की, काही पुरूष किंवा काही महिला पहाटे पहाटे शारीरिक संबंधासाठी अधिक एक्सायटेड असतात. प्रत्येकाचा मूड हा वेगवेगळा असू शकतो. पण साधारणपणे पुरूष सकाळच्या वेळी जास्त एक्सायटेड असतात. तर महिला झोपण्याआधी. असं का होतं तर याचं साधं उत्तर म्हणजे हार्मोन्समुळे. चला जाणून घेऊ सेक्स क्लॉक कसं काम करते.
सकाळी ५ वाजता(पुरूष)
झोपेतून उठण्याआधी पुरूषांची टेस्टोस्टेरॉन लेव्हल पीकवर असते. हे प्रमाण दिवसाच्या तुलनेत साधारण २५ ते ५० टक्के अधिक असतं. असं होण्याचं कारण म्हणजे पिट्यूटरी ग्लॅंड, ज्याने मेल सेक्स हार्मोन्स रेग्युलेट होतात, ते रात्री स्वीच ऑन होतात. आणि सकाळपर्यंत टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण वाढतं.
सकाळी ५ वाजता(महिला)
महिलांमध्येही टेस्टोस्टेरॉन तयार होतात, हेच हार्मोन सेक्स ड्राइव्हसाठी जबाबदार असतात. पण महिलांचं यांचं प्रमाण कमी असतं आणि याचं प्रमाण रात्रीचं थोडं वाढतं. हे बॅलन्स करण्यासाठी एस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन हे हार्मोन्सही असतात. पुरूषांमध्ये शारीरिक संबंधाची इच्छा जागण्यासाठी थोड्याच टेस्टोस्टेरॉनची गरज असते. सकाळी टेस्टोस्टेरॉन वाढण्याचा अर्थ म्हणजे पुरूष आठवड्यातून दोन ते तीनदा इरेक्शनसोबत उठतात.
सकाळी ६ वाजता
जर पुरूषांना चांगली झोप लागली असेल तर याचा अर्थ असा होतो की, सकाळी त्यांचं सेक्शुअल डिजायर आणखी वाढतं. रिसर्चमधून हे सिद्ध झालं आहे की, जे पुरूष जेवढी जास्त चांगली आणि जास्त झोप घेतली तर त्यांच्यातील टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण जास्त राहतं. एका रिसर्चनुसार, ५ तासांपेक्षा जास्त झोपल्यावर पुरूषांचं टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण १५ टक्क्यांनी अधिक वाढतं.
सकाळी ७ वाजता
जेव्हा पुरूष झोपून उठतात तेव्हा त्यांच्यात सेक्स हार्मोन्सचं प्रमाण सर्वात असतं. तेच महिलांमध्ये सर्वात कमी असतं. मेल आणि फीमेल सेक्स हार्मोन्स एकमेकांच्या विरूद्ध वेळेला हाय राहतात. त्यामुळे दोघांमध्ये ताळमेळ बसत नाही.
सकाळी ८ वाजता
जसेही पुरूष आणि महिला दिवसासाठी तयार होत असतात, तेव्हा त्यांच्यातील स्ट्रेस हार्मोन कॉर्टिसॉलचं प्रमाण वाढू लागतं. जे सेक्स हार्मोनचा प्रभाव नष्ट करतात. रिसर्चचं मानाल तर कॉर्टिसोल महिला आणि पुरूष दोघांच्याही सेक्स ड्राइव्ह कमी करतो.
दुपारी १२ वाजता
कोणत्याही आकर्षक व्यक्तीला बघून मेंदूत लगेच फील-गुड न्यरोट्रान्समिटर्स ज्याला एंडॉर्फिन्स म्हणतात, ते ट्रिगर होतात आणि हे पुरूषांच्या जेनाइटल्सपर्यंत पोहोचतात. तेच सेक्स हार्मोन्स वाढण्यात थोडा वेळ लागतो. पण ज्या लोकांचं टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण जास्त असतं, ते एखाद्या आकर्षक व्यक्तीला बघून जास्त फ्लर्ट करू लागतात. तेच एका रिसर्चनुसार, ज्या पुरूषांमध्ये टेस्टोस्टेरॉन जास्त असतं ते महिलांना जास्त आकर्षक वाटतात.
दुपारी १ वाजता
लंच टाइममध्ये जर एखादी महिला हॅंडसम व्यक्तीला बघत असेल तर फार कमी चान्स असतो की, त्यांना काही वाटत असेल. पण पुरूषांसोबत असं होत नाही, खासकरून ते जर त्या महिलेला आधीच पसंत करत असतील. रिसर्चमधून असेही समोर आलं आहे की, महिलांचं टेस्टोस्टेरॉन वाढण्याची तेव्हा शक्यता अधिक असते, जेव्हा त्या पार्टनरसोबत शारीरिक संबंध ठेवणार असतात.
सायंकाळी ६ वाजता
सायंकाळ होताच पुरूषांचं टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण कमी होऊ लागतं. तर महिलांचं हळूहळू वाढू लागतं. रिसर्चमधून असंही समोर आलं आहे की, वर्कआउट आणि जिमनंतर दोन्ही जेंडरची कामेच्छा वाढते. रिसर्चमध्ये असं आढळलं आहे की, वर्कआउटनंतर लोकांनी ३० टक्के जास्त वेळ संबंध ठेवले आणि २६ टक्के जास्त ऑर्गॅज्मचा आनंद मिळाला.
सायंकाळी ७ ते १० वाजेपर्यंत
सायंकाळी तणावपूर्ण दिवस संपल्यावर हलकं म्युझिक ऐकल्यानेही सेक्स हार्मोनचं प्रमाण वाढतं. पण ही बाब महिलांवर लागू पडते. पुरूषांचा याचा उलटा प्रभाव पडतो. पुरूषांना त्यांच्या आवडत्या खेळात आवडती टीम जिंकली तर त्यांचा मूड बनू शकतो. ९ वाजताच्या आसपास पुरूषांचं टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण वाढू लागतं. जे ११ वाजतानंतर पीकवर असतं. तेच १० वाजेपर्यंत पुरूषांचं टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण सर्वात कमी असतं. पण तरी सुद्धा ते सायंकाळी संबंधासाठी तयार राहतात. कारण या स्थितीतही त्यांच्यातील टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण महिलांपेक्षा जास्तच असतं.