लैंगिक जीवन : लव्ह बाइट कसा असतो; हे सोडून त्याबाबत तुम्हाला 'या' गोष्टी माहीत आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2019 03:26 PM2019-06-12T15:26:18+5:302019-06-12T15:37:11+5:30

एका हॉट आणि लव्ह मेकिंग सेशननंतर म्हणजे एका पूर्ण संतुष्टी देणाऱ्या काम क्रिडेनंतर आरशात पाहिल आणि मानेवर किंवा चेहऱ्यावर लव्ह मार्क्स दिसले तर अनेकांना टेन्शन येतं.

know the surprising facts about love bite | लैंगिक जीवन : लव्ह बाइट कसा असतो; हे सोडून त्याबाबत तुम्हाला 'या' गोष्टी माहीत आहेत का?

लैंगिक जीवन : लव्ह बाइट कसा असतो; हे सोडून त्याबाबत तुम्हाला 'या' गोष्टी माहीत आहेत का?

googlenewsNext

(Image Credit : BuzzGhana)

एका हॉट आणि लव्ह मेकिंग सेशननंतर म्हणजे एका पूर्ण संतुष्टी देणाऱ्या काम क्रिडेनंतर आरशात पाहिल आणि मानेवर किंवा चेहऱ्यावर लव्ह मार्क्स दिसले तर अनेकांना टेन्शन येतं. कारण हे लव्ह बाइट्स लपवणं सोपं काम नसतं आणि हे कुणाला दिसू नये अशीही अपेक्षा असते. लव्ह बाईट्स त्वचेवर एखाद्या जागेवर इंटेस सकिंग(जोरात शोषण) केल्याने होतात. ही शारीरिक संबंधावेळी होणारी एक सामान्य बाब आहे. 

होऊ शकतो परमनंट मार्क

(Image Credit : EyeEm)

लव्ह बाइटचे निशाण काही लोकांच्या शरीरावर नेहमीसाठी तसेच राहतात. हे कधीही दूर होत नाहीत. पण कालांतराने ही खूण हलकी नक्कीच होते. त्वचेच्या फार आत इजा झाली तर असं होतं. असं काही होऊ नये असं वाटत असेल तर पार्टनरसोबत याबाबत बोला आणि आवेशात असं काही करू नका हे सांगा.

यांना जास्त होते समस्या

(Image Credit : Catch News)

जर त्वचेवर जराही दबाव पडला तर तुमच्या त्वचेवर लगेच निळी किंवा काळी पडत असेल तर तुमच्या शरीरात आयर्नची कमतरता असल्याचा हा संकेत आहे. ज्या लोकांच्या शरीरात आयर्नची कमतरता होते, त्यांच्या शरीराव लव्ह बाईट लगेच उमटतात. अशात आहारावर लक्ष देणं गरजेचं आहे. 

मोठी होऊ शकते समस्या

(Image Credit : commons.wikimedia.org)

जर शारीरिक संबंधावेळी योग्य ती काळजी घेतली नाही तर लव्ह बाइट गंभीर लैंगिक आजाराचं रूप घेऊ शकतो. तसेच याने तुमच्या जोडीदाराच्या मनात भीतीही बसू शकते. शारीरिक संबंधावेळी सौम्य, पार्टनरची उत्तेजना वाढेल असा चावा घेणे सामान्य बाब आहे. पण हिंसक होऊ चावा घेणे महागात पडू शकतं.

ओरल हर्पीज

(Image Credit : procaffenation.com)

दोघांपैकी एकाला जर शरीरावर कुठे गजकरण किंवा त्वचेसंबंधी इतर समस्या असेल आणि दुसरा पार्टनर त्याच जागेवर चुकून चावा घेत असेल, तर या स्थितीत ओरल हर्पीज म्हणजे तोडांच्या त्वचेशी संबंधित समस्या होऊ शकते.   

लव्ह बाइट आणि सायकॉलॉजी

(Image Credit : Healthline)

सायकॉलॉजी अभ्यासानुसार,  जर तुम्ही लव्ह बाईटबाबत कल्पना करत असाल तर ही सेक्शुअल नाही तर सायकॉलॉजीकल समस्या आहे. असंही होऊ शकतं की, तुमच्या लव्ह लाइफमध्ये काही सुधारणेची गरज आहे. आणि असंही होऊ शकतं की, तुमच्या मनात काहीतरी ओढाताण सुरू असेल.

रिसर्च काय सांगतो?

लैंगिक समस्यांचा अभ्यास करणारे अभ्यासक हॅवलॉक इल्स यांनी त्यांच्या एका रिसर्चमध्ये सांगितले होते की, जास्तीत जास्त सस्तन प्राणी हे शारीरिक संबंधावेळी पार्टनरच्या मानेवर किस करतात. याने उत्तेजना वाढते.

Web Title: know the surprising facts about love bite

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.