लैंगिक जीवन : काय आहे ऑटोसेक्शुअ‍ॅलिटी? एक तरूणी सांगतेय तिची कहाणी!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 01:13 PM2019-06-13T13:13:58+5:302019-06-13T13:21:17+5:30

स्वत:च स्वत:कडे आकर्षित होणं असं कधी तुम्ही ऐकलंय का? कदाचित ऐकलं नसले. याला 'ऑटोसेक्शुअल' असं म्हणतात. 

Know what is Autosexual? These people attracts to seeing himself | लैंगिक जीवन : काय आहे ऑटोसेक्शुअ‍ॅलिटी? एक तरूणी सांगतेय तिची कहाणी!

लैंगिक जीवन : काय आहे ऑटोसेक्शुअ‍ॅलिटी? एक तरूणी सांगतेय तिची कहाणी!

Next

(Image Credit : The Week UK)

सामान्यपणे आपल्याला हे माहीत आहे की, दोन विरूद्ध लिंगाचे व्यक्ती एकमेकांकडे आकर्षित होता. आणखी एक मुद्दा म्हणजे महिला महिलांकडे आकर्षित होतात आणि पुरूषही पुरूषांकडे आकर्षित होतात. यांना होमोसेक्शुअल, गे किंवा लेस्बियन असं म्हटलं जातं. पण स्वत:च स्वत:कडे आकर्षित होणं असं कधी तुम्ही ऐकलंय का? कदाचित ऐकलं नसले. याला 'ऑटोसेक्शुअल' असं म्हणतात. 

काय आहे  'ऑटोसेक्शुअल' ?

(Image Credit : Dictionary.com)

बीबीसीच्या एका वृत्तानुसार, ते लोक जे स्वत:च्या शरीराला पाहून स्वत:ची लैंगिक गरज भागवू शकतात आणि हे लोक स्वत:चं शरीर बघूनच आकर्षित होतात. याला विज्ञानाच्या भाषेत 'ऑटोसेक्शुअल' असं म्हटलं जातं. असे लोक ना गे असतात ना लेस्बियन असतात. यांच्यासाठी 'ऑटोसेक्शुअल' हा शब्द वापरला जातो. या लोकांना कोणत्याही जेंडरच्या व्यक्तीकडे पाहून लैंगिक आकर्षण वाटत नाही.

(Image Credit : YouTube)

ऑटोसेक्शुअल हा एका शब्द आहे जो परिभाषिक करण्यासाठी वैज्ञानिकांना फार मेहनत घ्यावी लागली. या शब्दाचं विश्लेषण करण्यासाठी ना जास्त माहिती उपलब्ध आहे ना यावर कधी रिसर्च झाला. १९८९ मध्ये पहिल्यांदा या शब्दाचा उल्लेख डॉक्टर बर्नाड एपेलबाउम यांनी केला होता. त्यांनी या शब्दाचा वापर त्या लोकांसाठी केला होता जे दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या ऑटोसेक्शुअ‍ॅलिटीने आकर्षित होऊ शकत नाहीत. पण आता हा शब्द त्या लोकांसाठी केला जात होता जे त्यांच्याच शरीराकडे बघून सेक्शुअली आकर्षित होता.

तज्ज्ञ काय सांगतात?

'मॉडर्न सेक्शुअ‍ॅलिटी - द ट्रूथ अबाउट सेक्स अ‍ॅन्ड रिलेशनशिप' चे लेखक मायकल आरोन याबाबत सांगतात की, स्वत:ला बघून आकर्षित होणं फार सामान्य बाब आहे. पण काही लोकांना दुसऱ्यांच्या तुलनेत स्वत:ला बघून किंवा स्पर्श करून अधिक उत्तेजना जाणवते. अशाच लोकांना ऑटोसेक्शुअल म्हटलं जातं.

(Image Credit : thetab.com)

काही तज्ज्ञाचं असं मत आहे की, दुसऱ्या लोकांप्रमाणेच ऑटोसेक्शुअल लोकांमध्येही सेक्शुअ‍ॅलिटीचे वेगवेगळे प्रकार बघायला मिळतात. काही लोक ऑटोसेक्शुअल असण्यासोबतच ऑटोरोमॅंटिकही असतात. हे लोक स्वत:सोबतच डेटला जातात किंवा चांगल्या वातावरणात एक वॉक घेऊन येतात.

ऑटोसेक्शुअल तरूणीची कहाणी

अशाच एका ऑटोसेक्शुअल तरूणीने तिच्या या वेगळेपणाबाबत सांगितलं की, 'हे ऐकायला थोडं विचित्र नक्की वाटेल की, मी स्वत:ला बघूनच आकर्षित होते. इतर टीनएजर्सप्रमाणे मलाही माझ्या व्यक्तिमत्वाबाबत आणि लूकबाबत चिंता राहते. जेव्हाही मी आंघोळ करून येते, कपडे परिधान करते किंवा सेक्शुअल आकर्षणाच्या शोधात असते तेव्हा मी स्वत:ला आरशात बघते'.

ती पुढे सांगते की, 'भलेही माझं शरीर आकर्षक नसेल. मी बारीक आहे, माझे केस कुरळे आहेत, पण कपड्यांशिवाय माझं शरीर मला फार आकर्षित करतं. माझ्या सेक्शुअ‍ॅलिटीबाबत मला कधीच विचित्र काही वाटत नाही. पण १७ वर्षांची असताना जेव्हा मी माझ्या मित्रांसोबत याबाबत बोलली तेव्हापासून माझी याबाबत विचारसरणी बदलली. मी त्यांना माझ्याबाबत सांगितले तेव्हा ते हसायला लागले. मी पण त्यांच्यासोबत हसत होते. विचार करत होते की, माझ्यात काय चुकीचं आहे. तेव्हा मला कळालं की, मी स्वत:च्या शरीरासोबतच सेक्शुअली आकर्षित आहे. आता मला अशा भावनेची सवय झाली आहे. आता मी स्वत:ला गर्वाने ऑटोसेक्शुअल सांगते'.

Web Title: Know what is Autosexual? These people attracts to seeing himself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.