लैंगिक जीवन : 'या' ५ स्टेजेसचा प्रत्येकाला करावा लागतो सामना!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 03:22 PM2019-09-25T15:22:43+5:302019-09-25T15:22:49+5:30
सुरूवातीला दोघेही एकमेकांपासून दूर राहू शकत नाहीत आणि प्रत्येकक्षणी डोक्यात केवळ पार्टनरसोबत इंटिमेट होण्याचे विचार घोळत असतात.
लग्नानंतर जीवनात वेगवेगळे सरप्राइजेस मिळतात यात जराही शंका नाही आणि लैंगिक जीवनही यातून वेगळं नाही. सुरूवातीला दोघेही एकमेकांपासून दूर राहू शकत नाहीत आणि प्रत्येकक्षणी डोक्यात केवळ पार्टनरसोबत इंटिमेट होण्याचे विचार घोळत असतात. तेच काही काळाने अशी स्थिती तयार होते की, शारीरिक संबंधासाठी वेळच मिळत नाही. अशात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, विवाहित कपलच्या लैंगिक जीवनात येणाऱ्या वेगवेगळ्या स्टेज...
हनीमून सेक्स
नावारूनच कळून येतं की, या स्टेजमध्ये सगळं कसं मधासारखं गोड फारच गोड आणि फार रोमॅंटिक असतं. मित्र, नातेवाईक, परिवार आणि प्रत्येक प्रकारचं टेन्शनपासून दूर कपल्स आयुष्यभरासाठी आठवणी तयार करण्याचा प्रयत्न करतात. याला लैंगिक जीवनातील गोल्डन पीरियड म्हटलं जातं.
ऑव्यूलेशन सेक्स
लग्नाच्या साधारण १ ते २ वर्षांनी कपल्सच्या जीवनात ही स्टेज येते, जेव्हा तुम्ही कुटूंब वाढवण्याचं म्हणजे बाळाचं प्लॅनिंगसाठी शारीरिक संबंध ठेवता. यादरम्यान पत्नीच्या सर्व फर्टाइल(गर्भधारण राहू शकते असे दिवस) दिवसांना लक्षात घेऊन शारीरिक संबंध ठेवले जातात. जेणेकरून कोणतीही अडचण येऊ नये. सोबतच कपल्स या काळात वेगवेगळ्या पोजिशनही ट्राय करतात.
सेकंड ट्रायमेस्टर सेक्स
काही पुरूष असेही असतात जे पत्नी गर्भवती राहिल्यानंतरही शारीरिक संबंध ठेवतात. मुळात गर्भधारणा झाल्यावर पहिल्या तीन महिन्यात शारीरिक संबंध ठेवणं रिस्की असतं. पण जर गर्भधारणेत कोणत्याही प्रकारची काही अडचण नसेल तर दुसऱ्या तिमाहीला सेक्ससाठी थोडं सेफ मानलं जातं.
नो सेक्स डेज
बाळाच्या जन्मानंतर सामान्यपणे कपल्सच्या जीवनात अशी वेळ येते की, ते बाळाकडे लक्ष देण्यात इतके बिझी होतात की, त्यांना शारीरिक संबंधासाठी वेळच मिळत नाही. जो वेळ त्यांना मिळतो, त्यात ते आराम करतात. त्यामुळे जवळ-जवळ शारीरिक संबंध या काळात होतच नाही.
सायलेंट सेक्स
ही अशी स्टेज असते जेव्हा लोक मुलं जागे होऊ नये म्हणून शांततेत शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करतात. कारण मुल उठण्याची रिस्क ते घेऊ शकत नाहीत.