लैंगिक जीवन : पुरूषांच्या तुलनेत विवाहित महिलांना कमी मिळतो 'हा' अनुभव!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2019 03:46 PM2019-02-01T15:46:06+5:302019-02-01T15:48:22+5:30
जेव्हा तुमच्या लग्नाला काही वर्ष झाली असतात तेव्हा तुम्ही एकमेकांबाबत सगळंकाही माहीत आहे असा समज होतो.
जेव्हा तुमच्या लग्नाला काही वर्ष झाली असतात तेव्हा तुम्ही एकमेकांबाबत सगळंकाही माहीत आहे असा समज होतो. इतकेच काय तर शारीरिक संबंध ठेवताना कोणती गोष्टी जोडीदाराला उत्तेजित करते आणि कोणती नाही, हेही अनेकांना माहीत आहे असं वाटत असतं. तसेच अनेक पुरूषांचा हा गैरसमज असतो की, त्यांची पत्नी प्रत्येकवेळी शारीरिक संबंध ठेवताना ऑर्गॅज्मचा अनुभव घेते. पण एका रिसर्चमधून याबाबत फारच आश्चर्यजनक बाब समोर आली आहे.
काय सांगतो रिसर्च?
हा रिसर्च ब्रिघम यंग यूनिव्हर्सिटीमध्ये करण्यात आला होता. यात १ हजार ६८३ विवाहित जोडप्यांचा समावेश करण्यात आला होता. यात त्यांना प्रश्न विचारण्यात आले की, तुम्ही किती वेळा ऑर्गॅज्मपर्यंत पोहोचता. तसेच पार्टनर कितीवेळा ऑर्गॅज्मचा अनुभव घेते किंवा घेतो आणि त्यांना शारीरिक संबंधादरम्यान किती संतुष्टी मिळते. यावर मिळालेली उत्तरे धक्कादायक आहे.
महिलांना कमी येतो अनुभव
या रिसर्चचे निष्कर्ष सांगतात की, ८७ टक्के विवाहित पुरूष म्हणाले की, शारीरिक संबंधादरम्यान त्यांना ऑर्गॅज्मचा अनुभव मिळतो. तर केवळ ४९ टक्के महिलांनी सांगितले की, त्यांना शारीरिक संबंधादरम्यान ऑर्गॅज्मचा अनुभव मिळतो.
जोडीदाराच्या ऑर्गॅज्मबाबत गैरसमज
या रिसर्चमधून आणखी एक आश्चर्यजनक गोष्ट समोर आली होती की, जास्तीत जास्त पुरूषांना हा गैरसमज होता की, त्यांची जोडीदार शारीरिक संबंधादरम्यान ऑर्गॅज्मचा अनुभव घेतात. रिसर्चमध्ये सहभागी ४३ टक्के पुरूषांचं म्हणणं होतं की, हे जाणून घेणं कठीण होतं की, पत्नीला ऑर्गॅज्मचा अनुभव मिळाला की नाही. तर २५ टक्के पुरूषांनी सांगितले की, जोडीदाराच्या उत्साहाला किंवा उत्तेजनेला त्यांनी ऑर्गॅज्म समजण्याची चूक केली.
ऑर्गॅज्म गॅप
महिला आणि पुरूषांना ऑर्गॅज्मपर्यंत पोहोचण्यासाठी जो वेळ लागतो त्याला ऑर्गॅज्म गॅप म्हटले जाते. जसा की या रिसर्चमध्ये खुलासा करण्यात आला आहे की, विवाहित महिलांना पुरूषांच्या तुलनेत ऑर्गॅज्मता कमी अनुभव मिळतो. हे त्या लोकांचे डोळे उघडण्यासाठी पुरेसं आहे ज्यांना वाटतं की, पुरूष आणि महिला दोघांनाही शारीरिक संबंधादरम्यान ऑर्गॅज्मचा अनुभव मिळतो.