लैंगिक जीवन : थकव्यामुळे सतत इच्छाच होत नसेल तर 'ही' ट्रिक ठरेल फायदेशीर...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 04:31 PM2019-10-05T16:31:24+5:302019-10-05T16:31:56+5:30
शारीरिक संबंधातून केवळ दोन शरीरच एक होतात असं नाही तर दोन व्यक्तींची जवळीकताही याने वाढते. त्यामुळे आलेला थकवा, आळस दूर करण्यासाठी काही खास ट्रिक वापरता येतील.
धावपळीच्या जीवनात लग्नाच्या काही वर्षांनी लोकांचा लैंगिक जीवनातील रस कमी होऊ लागतो. दिवसभराचा थकवा आणि दुसऱ्या दिवशी ऑफिसची किंवा मुलांची चिंता यामुळे बेडवर पडल्या-पडल्या झोप येऊ लागते. जर हे रूटीन होत असेल तर हे चुकीचं आहे. कारण शारीरिक संबंधातून केवळ दोन शरीरच एक होतात असं नाही तर दोन व्यक्तींची जवळीकताही याने वाढते. त्यामुळे आलेला थकवा, आळस दूर करण्यासाठी काही खास ट्रिक वापरता येतील.
मसाजने वाढेल ब्लड सर्कुलेशन
मसाज केल्याने शरीरातील रक्तप्रवाह वाढतो आणि शरीराच्या सर्वच भागात रक्त पोहोचू लागतं. जर तुमच्या पार्टनरला थकवा जाणवत असेल तर त्यांची पाठीची मसाज केल्यास त्यांचा तणाव कमी होऊ शकतो. अशात आवडीचं संगीत लावलं आणि कमी प्रकाशाचा लाइट लावाल तर शारीरिक संबंधाची इच्छा पुन्हा जागी होऊ शकते.
स्पर्शाची जादू
हळूहळू त्यांना तुमचा स्पर्श जाणवू द्या. याने त्यांची उत्तेजना वाढेल. हे लक्षात ठेवा की, मसाज कधीच घाईघाईने करायची नसते. पार्टनरचे रिअॅक्शन बघा आणि त्यानुसारच पुढे जा.
शरीराचे इशारे समजून घ्या
एक्सपर्टनुसार, त्वचा शरीरातील सेंशुअल पार्ट आहे. जेव्हा आपण कुणाला स्पर्श करतो तेव्हा ऑक्सिटोसिन हार्मोन रिलीज होतात. जेव्हा पार्टनर्स एकमेकांच्या जवळ असतात तेव्हा त्यांचं शरीर इंडिकेशन देतं की, त्यांना कोणत्या भागात स्पर्श हवा. त्यामुळे शरीराची ही भाषा समजून घ्या.
या भागांवर करा फोकस
बॉडीचे काही भाग जसे की, मानेच्या मागे आणि मानेखाली, गुडघ्याच्या मागे म्हणजे अशा जागांवर फोकस करा जिथे नसा जास्त आहेत. त्यांच्या सेंसिटीव पार्ट्सवर फोकस करा.
व्हजायनल मसल्सचं कनेक्शन
महिलांच्या अॅब्सच्या आजूबाजूच्या मसल्सचं कनेक्शन व्हजायनल मसल्ससोबत असतं. इथे हलक्या हाताने मसाज करा, याने त्यांची एक्साइटमेंट वाढेल.