लैंगिक जीवन : हस्तमैथुनाने कॅलरी बर्न होतात का?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2019 04:12 PM2019-07-11T16:12:20+5:302019-07-11T16:13:31+5:30
काहींना असाही प्रश्न पडतो की, हस्तमैथुन करूनही कॅलरी बर्न होतात का? किंवा शारीरिक संबंधा एवढाच फायदा हस्तमैथुनाने मिळतो का?
शारीरिक संबंधातून शारीरिक आणि मानसिक असे दोन्ही प्रकारचे फायदे महिला आणि पुरूषांना होत असतात. अनेक तज्ञांनुसार, शारीरिक संबंध ही एक एक्सरसाइजच आहे. याचा एक मोठा फायदा म्हणजे शारीरिक संबंधावेळी शरीरातील कॅलरी बर्न होतात. या कॅलरी बर्न करण्यासाठी लोक वेगवेगळ्या एक्सरसाइज करत असतात. पण मग काहींना असाही प्रश्न पडतो की, हस्तमैथुन करूनही कॅलरी बर्न होतात का? किंवा शारीरिक संबंधा एवढाच फायदा हस्तमैथुनाने मिळतो का?
कॅलरी बर्न होतात का?
एनबीटीने दिलेल्या एका वृत्तात, एका रिसर्चनुसार सेक्शुअल अॅक्टिविटीदरम्यान पुरूषांमध्ये १०१ कॅलरी आणि महिलांमध्ये ६९.१ कॅलरी बर्न होतात. सामान्यपणे लैंगिक क्रियेचा कालावधी ३० मिनिटे पकडला तर सरासरी ३.६ कॅलरी बर्न होतात. जर इंटरकोर्स दरम्यान १०१ कॅलरी बर्न केल्या जात असतील, तर हस्तमैथुनावेळी बर्न होणाऱ्या कॅलरींचं प्रमाण कमी असेल. कारण यात जास्त फिजिकल मुव्हमेंट होत नाही.
कॅलरी बर्न होण्यासाठी कार्डिओ मुव्हमेंट(शारीरिक हालचाल) होणे गरजेचे आहे. जी हस्तमैथुनावेळी होत नाही. क्लायमॅक्समध्येही हार्ट रेट जास्त राहत नाही की, कॅलरी बर्न होतील. मग कॅलरी बर्न होत नाही तर हस्तमैथुन करणं हेल्दी नाही का? तर असं अजिबात नाही. हस्तमैथुनामुळे शरीरात एंडॉर्फिन हार्मोनचं प्रमाण वाढतं. या हार्मोनमुळे आनंद मिळतो. या हार्मोनला हॅपी हार्मोनही म्हणतात.
आरोग्यासाठी हानिकारक?
नाही. हस्तमैथुनामुळे तुम्ही अंध किंवा वेडे होत नाहीत. तसेच हस्तमैथुन केल्याने डोळ्याखाली डार्क सर्कलही होत नाहीत. तसेच शारीरिक विकासही रोखला जात नाही. वास्तविकता ही आहे की, हस्तमैथुन केल्याने तुमचा तणाव कमी होतो आणि शरीराला आनंद देणारे इन्डॉर्फिन हार्मोस रिलीज होतात. याने तुम्हाला रिलॅक्स वाटतं.
तज्ज्ञ काय सांगतात?
सेक्सॉलॉजिस्ट डॉ. राजन भोसले यांनी सांगितले की, ‘‘भर तारुण्यात वेळोवेळी उफाळून येणाऱ्या कामवासनेला वाट मोकळी करून देण्यासाठी हस्तमैथुनाचा सुरक्षित मार्ग अवलंबणं गरजेचं असतं. दाटलेल्या लैंगिक उत्तेजनेला मोकळी वाट करून देण्यास जर आपण मज्जाव केला तर तेसुद्धा अनेक प्रकारे शारीरिक व मानसिकदृष्टय़ा घातक ठरू शकतं.’’