महिलांमध्ये कामेच्छा कमी असण्याचं 'हे' असू शकतं कारण!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 02:30 PM2018-12-28T14:30:28+5:302018-12-28T14:31:08+5:30

वैवाहिक जीवनात अनेकदा महिला जोडीदार शारीरिक संबंधासाठी नाही म्हणत असेल, तर ही चिंतेची बाब असू शकते.

This may be the reason for lack of sexual desire in women | महिलांमध्ये कामेच्छा कमी असण्याचं 'हे' असू शकतं कारण!

महिलांमध्ये कामेच्छा कमी असण्याचं 'हे' असू शकतं कारण!

googlenewsNext

वैवाहिक जीवनात अनेकदा जोडीदार शारीरिक संबंधासाठी नाही म्हणत असेल तर ही चिंतेची बाब असू शकते. तुमच्या जोडीदाराचा शारीरिक संबंधातील रस कमी झाला असेल अशीही शक्यता असू शकते. याला महिला लैंगिक अक्षमता असं म्हटलं जातं. जी व्यक्ती आपल्या जोडीदाराला शारीरिक संबंधावेळी सहयोग करत नाही. अशा व्यक्तीसाठी या शब्दाचा वापर केला जातो. महिलांमध्ये लैगिक अक्षमता म्हणजेच एफएसडी समस्या असण्याची वेगवेगळी कारणे असू शकतात. जसे की, शारीरिक संबंधावेळी वेदना होणे, हे एक मुख्य कारण आहे. जास्तीत जास्त प्रकरणांमध्ये एफएसडीला मनोवैज्ञानिक कारणांसाठी जबाबदार धरलं जातं. अशावेळी जास्त उशीर न करता महिलेने तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे ठरते.

काय आहे एफएसडी?

महिला लैंगिक अक्षमता (एफएसडी) ही फार सामान्य समस्या आहे. अमेरिकेतील एका सर्वेक्षणानुसार, ४३ टक्के महिला एफएसडीच्या शिकार आहेत. ही समस्या होण्याचं मुख्य कारण मानसिक आहे. जोडीदारासोबत असमंजसपणा आणि शारीरिक कारणांमध्ये मधुमेह, एनीमिया किंवा थायरॉइड हे सांगता येतील. तसेच महिलांच्या गुप्तांगाशी संबंधित समस्याही याचं कारण ठरु शकते. 

मानसिक समस्या

पुरुषांसाठी शारीरिक संबंध एका शारीरिक मुद्दा असू शकतं. पण महिलांसाठी हा एक भावनिक मुद्दा आहे. जोडीदारासोबतच्या आधीच्या काही वाईट अनुभवांमुळे महिला भावनात्मक रुपाने खचतात. यामुळे त्या डिप्रेशनमध्ये येतात आणि त्यांचा शारीरिक संबंधातील रस कमी झालेला बघायला मिळतो.

परमोच्च आनंद न मिळणे

एफएसडीचा दुसरा भाग एनोर्गस्मिया आहे. ही स्थिती तेव्हा निर्माण होते जेव्हा व्यक्तीला परमोच्च आनंद मिळत नाही किंवा ना कधी तिथपर्यंत पोहोचू शकत. परमोच्च आनंदापर्यंत पोहोचणं ही सुद्धा एक मेडिकल कंडीशन आहे. शारीरिक संबंधातील रस कमी होणे आणि परमोच्च आनंदापर्यंत पोहोचण्यास असमर्थता या दोन्ही बाबी गंभीर आहेत. हे अधिक यामुळे होतं कारण महिलांना जास्त फोरप्ले पसंत असतो. जर असं झालं नाही तर त्यांच्यासाठी परमोच्च सुख मिळवणं कठीण होऊन बसतं. याचा मानसोपचार तज्ज्ञांच्या माध्यमातून उपचार करता येऊ शकतो.  

एफएसडीवर उपचार

कोणतेही घरगुती उपाय हे एफएसडी समस्येवर प्रभावी ठरत नाही. बाजारात अनेकप्रकारचे महिलांसाठीचे वायग्रा मिळतात, पण त्यातूनही अपेक्षित फायदा होताना दिसत नाही. त्यामुळे दुसरं काही न करता महिलांना सेक्स स्पेशालिस्टची मदत घेऊन उपचार घ्यावेत. तेव्हाच या समस्येतून सुटका होऊ शकते.
 

Web Title: This may be the reason for lack of sexual desire in women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.