लैंगिक जीवन : हिवाळ्यात पुरुषांना होते 'ही' समस्या, जाणून घ्या कारण!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 04:27 PM2018-12-24T16:27:10+5:302018-12-24T16:29:59+5:30

हिवाळ्यात थंडीमुळे महिलांच्या गुप्तांगामध्ये लुब्रिकेशन कमी होत असल्याने कोरडेपणा येतो, याबाबत वैवाहिक जोडप्यांनी अनेकदा ऐकले असेलच.

Mens private part shrink during the winter season and this is the reason | लैंगिक जीवन : हिवाळ्यात पुरुषांना होते 'ही' समस्या, जाणून घ्या कारण!

लैंगिक जीवन : हिवाळ्यात पुरुषांना होते 'ही' समस्या, जाणून घ्या कारण!

Next

हिवाळ्यात थंडीमुळे महिलांच्या गुप्तांगामध्ये लुब्रिकेशन कमी होत असल्याने कोरडेपणा येतो, याबाबत वैवाहिक जोडप्यांनी अनेकदा ऐकले असेलच. याला वैज्ञानिक भाषेत विंटर व्हजायना असं म्हणतात. मात्र, आता पुरुषांबाबत एक नवीन थिअरी समोर आली आहे. ज्यात सांगण्यात आलं आहे की, कशाप्रकारे बदलत्या वातावरणाचा आपल्या गुप्तांगावर प्रभाव पडतो. 

इरेक्शनमध्ये कमतरता

तज्ज्ञ सांगतात की, हिवाळ्यात थंडीमुळे पुरुषांचं गुप्तांग आकुंचन पावतं. तसेच इरेक्शनमध्येही कमतरता येते. त्यामुळे परमोच्च आनंद मिळवणं कठीण होऊन बसतं. सेक्स अॅन्ड रिलेशनशिप एक्सपर्ट ऐनाबेला नाइट म्हणाल्या की, 'हिवाळ्यात थंडीमुळे तापमान कमी होतं. यामुळे गुप्तांगापर्यंत येणाऱ्या रक्तवाहिन्या गोठू लागतात'. 

ऐनाबेला यांनी सांगितले की, जेव्हा वातावरण खूप जास्त कमी होतं तेव्हा पुरुषांच्या गुप्तांगाची लांबी ५० टक्क्यांपर्यंत कमी होते. तर जाडपणा २० ते ३० टक्के कमी होते. ऐनाबेला पुढे सांगते की, थंडीच्या वातावरणात आपलं शरीर गुप्तांगासाठी असलेली उष्णता आणि ऊर्जा शरीराच्या मध्यभागात असलेल्या आवश्यक अंगांपर्यंत पोहोचवतं. यादरम्यान गुप्तांग आकुंचन पावून शरीराला चिकटून राहतं. जेणेकरुन उष्णता मिळावी.  

संवेदनशीलता होते नष्ट 

बदलत्या वातावरणाचा केवळ गुप्तांगाच्या आकारावरच प्रभाव पडतो असे नाही. ऐनाबेला सांगतात की, थंड वातावरणात पुरुषांच्या गुप्तांगाची संवेदनशीलताही फार कमी होते. अशात स्पर्श केल्यावरही त्यांना उत्तेजना जाणवत नाही. याच सर्व कारणांमुळे थंडीच्या दिवसात परमोच्च आनंद मिळवण्यासाठी पुरुषांना अधिक जास्त वेळ लागतो. हे केवळ शारीरिक रुपाने थंडी वाजल्याने नाही तर थंडीमुळे त्यांचं ऑर्गन सुद्धा योग्यप्रकारे काम करत नसल्यानेही होतं. 

Web Title: Mens private part shrink during the winter season and this is the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.