पॉर्न पाहिल्याने महिलांच्या अनुभवात पडतो फरक, जाणून घ्या नेमकं काय होतं!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2019 03:55 PM2019-06-18T15:55:52+5:302019-06-18T16:01:34+5:30
अनेकजण शारीरिक संबंधाआधी आपल्या पार्टनरला पॉर्न व्हिडीओ दाखवतात. तुमच्यासोबतही असं झालं आहे का?
अनेकजण शारीरिक संबंधाआधी आपल्या पार्टनरला पॉर्न व्हिडीओ दाखवतात. तुमच्यासोबतही असं झालं आहे का? तुम्हाला त्यात सहजता वाटत नसेल, पण तुमच्या पार्टनरची पॉर्नमुळेच उत्तेजना वाढत असेल तर चिंतेची बाब नाही. ही समस्या केवळ तुमच्यासोबतच होते असं नाही तर अनेक महिलांना या समस्येचा सामना करावा लागतो.
पॉर्नमुळे असुरक्षिततेची भावना
एका नव्या रिसर्चमधून ही बाब समोर आली आहे की, पॉर्न पाहिल्यानंतर महिलांमध्ये त्यांच्या शरीराप्रति असुरक्षिततेची भावना विकसित होऊ लागते. जर्नल ऑफ विमेन्स हेल्थमध्ये प्रकाशित एका रिसर्चचे निष्कर्ष सांगतात की, हेट्रोसेक्शुअल म्हणजेच स्ट्रेट महिलांनी पॉर्न बघणे आणि त्यांच्या सेक्शुअल अनुभवात खोलवर कनेक्शन आहे. या रिसर्चनुसार, जर सेक्शुअर इंटरकोर्स दरम्यान पॉर्नबाबत विचार केला गेला तर महिलांना त्यांच्या लूकबाबत असुरक्षितता वाटू लागते. ज्यामुळे शारीरिक संबंधादरम्यान संतुष्टी आणि प्लेजर जाणवण्याचं प्रमाण कमी होतं.
पॉर्न पाहिल्यावर महिला-पुरूषांच्या अनुभवात फरक
अमेरिकेच्या वर्जिनिया कॉमनवेल्थ युनिव्हर्सिटीच्या सुजन जी कॉर्नस्टीन सांगतात की, अभ्यासकांनी स्पष्टपणे हे दाखवलं आहे की, पॉर्न पाहिल्यानंतर महिला आणि पुरूषांच्या सेक्शुअल अनुभवात कशाप्रकारे फरक असतो. पुरूषांमध्ये फार जास्त पॉर्न पाहिल्याने सेक्शुअल इंटिमसीची कमतरता येऊ शकते, तर महिला पॉर्न कन्टेन्टला त्यांच्या पर्सनल सेक्शुअल अनुभवांसोबत जोडतात.
हेट्रोसेक्शुअल महिलांवर सर्व्हे
या रिसर्चच्या अभ्यासकांच्या टिमने अमेरिकेत १८ ते २९ वयोगटातील ७०६ हेट्रोसेक्शुअल महिलांवर सर्व्हे केला आणि हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की, पॉर्नोग्राफीमुळे त्यांच्या सेक्शुअल एक्पीरिअन्स कसा होता, त्यांचं प्राधान्य कशाला होतं आणि पॉर्नबाबत त्यांच्या काय काय चिंता आहेत.