लैगिक जीवन : कामेच्छा कमी होण्याचं 'हे' असू शकतं कारण!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2019 04:16 PM2019-01-01T16:16:39+5:302019-01-01T16:20:28+5:30
अनेकदा काही जोडपी निरोगी जीवन जगत असले तरी त्यांचं लैंगिक जीवन फारसं उत्साही नसतं. सगळंकाही ठीक असूनही ते शारीरिक संबंधातून हवा तो आनंद मिळवू शकत नाहीत.
अनेकदा काही जोडपी निरोगी जीवन जगत असले तरी त्यांचं लैंगिक जीवन फारसं उत्साही नसतं. सगळंकाही ठीक असूनही ते शारीरिक संबंधातून हवा तो आनंद मिळवू शकत नाहीत. महत्वाचा मुद्दा असं नेमकं का होतं, याचं कारण त्यांना माहीत नसतं. कामेच्छा कमी होणे किंवा शारीरिक संबंधातून आनंद न मिळण्याच्या एका कारणाचा खुलासा नुकताच एका रिसर्चमधून करण्यात आलाय. त्यात सांगण्यात आलं आहे की, दातांची योग्य ती काळजी न घेतल्याने अनेकांच्या लैंगिक जीवनात समस्या निर्माण होऊ शकते.
तज्ज्ञ सांगतात की, जर तुमचं लैंगिक जीवन चांगलं नसेल तर लगेच आपल्या दातांची तपासणी करा. एका रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, जे लोक विश्वासाने, सुरक्षित आणि प्रेमाने भरपूर असलेल्या नात्यात राहतात त्यांच्या तोंडाचं आरोग्य चांगलं राहतं. जे प्रेमात असतात ते लोक स्वत:वर अधिक लक्ष देतात, ज्यात दातांच्याही आरोग्याचा समावेश आहे. पण जे दातांची काळजी घेत नाहीत, त्यांचं लैंगिक जीवन अडचणीत येऊ शकतं.
एबीसी डॉट नेट डॉट एयू ने ऑस्ट्रेलियातील यूनिव्हर्सिटी ऑफ क्वींसलॅंडच्या ग्रेस ब्रॅज्ड्रपोर्न यांच्या हवाल्याने सांगितले आहे की, 'आम्ही हे पाहून आश्चर्यचकित झालो की, कशाप्रकारे भरपूर रोमान्स असलेलं नातं आपली भूमिका बजावतं'. त्यांनी पुढे सांगितलं की, जे लोक भावनात्मक रुपाने आपल्या जोडीदारापासून दूर असतात, ते त्यांच्या दातांची नियमीत काळजी घेण्यात आणि दंत चिकित्सकांना भेटण्यास निष्काळीपणा करतात.
ब्रॅज्र्डपोर्न यांनी पुढे सांगितले की, 'आम्ही केलेल्या शोधाच्या निष्कर्षातून हे समोर येतं की, जे भावनात्मक अंतरंगापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतात ते चिंतेत असतात की, त्यांचे जोडीदार पुरुष किंवा महिला त्यांना गरजेच्या वेळी सोडून जातील. त्यांचं मौखिक स्वास्थ्य नकारात्मक असण्याची शक्यता असते. तेच दुसरीकडे जे प्रेमात पडलेले असतात, ते दुसऱ्यावर विश्वास ठेवतात आणि त्यांच्या दातांचं आरोग्यही चांगलं असतं, कारण ते दातांची योग्य ती काळजी घेतात.