संभोग असमर्थतेची समस्याः कारणं आणि उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 04:48 PM2018-10-24T16:48:22+5:302018-10-24T17:13:13+5:30

काही नवीन जोडप्यांमध्ये लैंगिक संबंधांबाबत फार जास्त उत्साह दिसून येणे जसं सामान्य आहे.

Problem of sexual Inability, causes and remedies | संभोग असमर्थतेची समस्याः कारणं आणि उपाय

संभोग असमर्थतेची समस्याः कारणं आणि उपाय

Next

काही नवीन जोडप्यांमध्ये लैंगिक संबंधांबाबत फार जास्त उत्साह दिसून येणे जसं सामान्य आहे. तसंच काहींमध्ये त्याबाबत असमर्थता दिसून येणेही तितकेच स्वाभाविक आहे. याची वेगवेगळी कारणे बघायला मिळतात. काहींमध्ये शारीरिक संबंधाचं असलेलं अपुरी माहिती तर काहींमध्ये संकोच ही याची प्राथमिक कारणे तज्ज्ञ सांगतात. या अडचणी दूर व्हायला थोडा वेळ जाऊ देणेही गरजेचे असते. 

या समस्येच्या कारणांबाबत सांगताना तज्ज्ञ सांगतात की, 'नव्या जोडप्यांना सुरुवातीच्या काळात हवे तसे शारीरिक संबंध प्रस्थापित करता न येणे हे स्वाभाविक आहे. समाधानकारक संभोग करता येणं, ही गोष्ट जमायला काही काळ त्याच्या प्रयत्नांमध्ये घालवावा लागतो. धीर न सोडता, एकमेकांची मदत आणि सहकार्याने प्रयत्न करत राहिल्यास सहज ते जमू लागतं'.

जोडप्यांना शारीरिक संबंध योग्य प्रकारे प्रस्थापित करण्याची माहिती नसणे म्हणजे नेमकं काय? यावर तज्ज्ञांनी सांगितले की, 'संभोग सुरू करण्याआधी जोडप्याने प्रणय म्हणजेच फोरप्ले करणं गरजेचं असतं. पण ही बाब अनेकांना माहितीच नसते. हा  प्रणय लैंगिक क्रियेसाठी महत्त्वाचा भाग आहे'.

असमर्थतेची आणखी काही कारणे तज्ज्ञ सांगतात की, 'पती-पत्नीला शारीरिक संबंधासाठी हवा तो एकांत न मिळणे, हे एक असमर्थतेचं कारण असू शकतं. त्यावेळी अंधार नसणं, खोलीत दुसरं कुणी झोपलेलं असणं, आपले आवाज इतरांना ऐकू जातील अशी भीती वाटणं अशा गोष्टींमुळे त्यांच्यातील इंटरेस्ट कमी होतो.

एक महत्त्वाचं कारण तज्ज्ञांनी हे सांगितलं की, 'एकमेकांबद्दल दोघांना लैंगिक आकर्षण नसणे. हेही एक मुख्य कारण सांगता येईल. लग्न जबरदस्तीने लावून दिलं असेल,  दुसऱ्या कुणावर प्रेम असेल, जोडीदाराला अस्वच्छ राहण्याची सवय असेल ही एकमेकांबद्दल लैंगिक आकर्षण नसण्यात होऊ शकते. 
 

Web Title: Problem of sexual Inability, causes and remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.