शीघ्रपतनाची समस्या; कारणं आणि उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2018 05:37 PM2018-10-19T17:37:16+5:302018-10-19T17:37:43+5:30

लग्नाला बरीच वर्षं झाल्यावरही अनेकांना शीघ्रपतनाची समस्या भेडसावत असते. त्यामुळे ते लैंगिक सुखाचा हवा तसा आनंद घेऊ शकत नाहीत आणि देऊही शकत नाहीत.

Quick erectile problems reasons and treatment | शीघ्रपतनाची समस्या; कारणं आणि उपाय

शीघ्रपतनाची समस्या; कारणं आणि उपाय

googlenewsNext

लग्नाला बरीच वर्षं झाल्यावरही अनेकांना शीघ्रपतनाची समस्या भेडसावत असते. त्यामुळे ते लैंगिक सुखाचा हवा तसा आनंद घेऊ शकत नाहीत आणि देऊही शकत नाहीत. अशात पती-पत्नी वेगवेगळया औषधांचा आधार घेतात. पण अनेकांना याचाही फायदा होताना दिसत नाही. काही जणांना तर त्याचे साईड इफेक्ट्स होतात. त्यामुळे या विषयासंदर्भात आम्ही काही डॉक्टरांची मतं जाणून घेतली. ही समस्या असल्यास डॉक्टर अनेक वेळा जोडप्यांना शारीरिक संबंध ठेवताना काही सूचना पाळण्याचा सल्ला देतात. त्यात सर्वात महत्त्वाचा सल्ला म्हणजे, शारीरिक संबंध ठेवताना थोडा संयम ठेवावा आणि लैंगिक क्रिया थोडा वेळ थांबवून आवेग कमी होऊ द्यावा. अशाप्रकारे शीघ्रपतन टाळता येऊ शकतं. 

समस्येची कारणे आणि उपाय

शीघ्रपतन होण्याची वेगवेगळी कारणे असतात. त्यातील  एक महत्त्वाचं कारण म्हणजे शरीरसंबंधांमधील दिवसांचं अंतर. म्हणजे जर एकदा शारीरिक संबंध ठेवले असतील आणि त्यानंतर बरेच दिवस जोडीदार जवळ आले नाहीत, तर शीघ्रपतनाची समस्या होऊ शकते. बरेच दिवस शारीरिक संबंध न ठेवल्यास शुक्राणूंचा मोठा साठा होता आणि तो वाहून जाण्यासाठी तयार असते. अशावेळीही शीघ्रपतन होण्याची समस्या होते. 

डॉक्टरांनुसार, शीघ्रपतनाचा खरा संबंध हा व्यक्तीच्या स्वभावातील उतावळेपणा आणि घाई याच्याशी असतो. काहीजण शरीरसंबंध ठेवताना 'आऊट ऑफ कंट्रोल' होतात. त्यांना या समस्येचा सामना करावा लागतो आणि पती-पत्नीचा अपेक्षाभंग होतो.

मानसिक कारण

यावर उपाय म्हणून अनेकजण शारीरिक उपचार घेतात. पण मुळात हा व्यक्तीच्या स्वभावाचा दोष असल्याने शारीरिक उपचार घेऊन फायदा होत नाही. अशावेळी मानसोपचार तज्ज्ञांची भेट घेऊन आणि सेक्स थेरपी करून तुम्ही उपचार घेऊ शकता.  

डॉक्टरांचा सल्ला

डॉक्टर सल्ला देतात की, मुळात यात दोन मनांचा आणि शरीरांचा संबंध असतो. त्यामुळे पती-पत्नी दोघांनी याबाबत आधीच चर्चा करणं गरजेचं असतं. शारीरिक संबंध ठेवताना उत्साह अधिक वाढला असताना त्यावर नियंत्रण ठेवावं, थोडा वेळ थांबावं आणि त्यानंतर उत्साह पूर्णपणे कमी होण्याआधी लैंगिक संबंध ठेवावे. अशाप्रकारे थोडा वेळ घेत शारीरिक संबंध ठेवले तर शीघ्रपतनाची समस्या दूर करता येऊ शकते.

Web Title: Quick erectile problems reasons and treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.