लैंगिक जीवन : शारीरिक संबंधानंतर महिलांना होते 'ही' समस्या, जाणून घ्या कारण!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2019 02:52 PM2019-04-03T14:52:01+5:302019-11-23T22:40:29+5:30

अनेक कपल्सना असं वाटतं की, शारीरिक संबंधात पार्टनरचा गंध महत्त्वाची भूमिका बजावतो.

The reason for fishy smell from female private part after intercourse | लैंगिक जीवन : शारीरिक संबंधानंतर महिलांना होते 'ही' समस्या, जाणून घ्या कारण!

लैंगिक जीवन : शारीरिक संबंधानंतर महिलांना होते 'ही' समस्या, जाणून घ्या कारण!

Next

(Image Credit : Scary Mommy)

अनेक कपल्सना असं वाटतं की, शारीरिक संबंधात पार्टनरचा गंध किंवा वास महत्त्वाची भूमिका बजावतो. इतकेच नाही तर अनेक कपल्स हे त्यांच्या पार्टनरच्या स्मेलनेच उत्तेजित होतात. पण जेव्हा विषय प्रायव्हेट पार्टच्या दुर्गंधीचा येतो तेव्हा याकडे अजिबातच दुर्लक्ष करू नये. अनेकदा शारीरिक संबंधानंतर महिलांच्या प्रायव्हेट पार्टमधून फिशी स्मेल येत असेल तर हा गंभीर इन्फेक्शन इशारा आहे.

न्यू यॉर्क येथील गायनकॉलॉजिस्ट आणि एमडी अलीसा ड्वेक यांच्यानुसार, जर वजायनामधून माशासारखी दुर्गंधी येत असेल तर ही समस्या बॅक्टेरिअल वजायनोसिस  (Bacterial vaginosis) किंवा ट्रायकोमोनिएसिस असू शकते. डॉक्टरांनुसार, या इन्फेक्शनच्या स्थितीमध्ये कंडोम न वापरता इंटरकोर्स केल्यावर प्रायव्हेट पार्टमधून माश्यांसारखा दुर्गंध येऊ लागतो. 

महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये जेव्हा बॅक्टेरिअल इन्वायर्नमेंटमध्ये परिवर्तन होतं तेव्हा त्यांच्या पीएच लेव्हलमध्ये फार कमतरता येते. आणि या कारणानेच माश्यासारखी दुर्गंधी येऊ लागते. अशा स्थितीत शारीरिक संबंध ठेवणे टाळले पाहिजे. आणि डॉक्टरांकडून वेळीच उपचार घ्यायला हवेत. 

अशी काही समस्या असेल आणि याकडे जराही दुर्लक्ष केलं तर तुम्हाला हे महागात पडू शकतं. हा तसा संसर्गजन्य आजार नाहीये, त्यामुळे पुरूषांना कोणतेही उपचार घेण्याची गरज नाही. पण महिलांनी या समस्येवर वेळीच उपचार घ्यावे. जेणेकरून लैंगिक जीवनाचा आनंद अधिक चांगल्याप्रकारे घेता येईल. 

Web Title: The reason for fishy smell from female private part after intercourse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.