'या' कारणांनी तरुणांमध्ये कमी होतोय शारीरिक संबंधातील रस!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2019 04:34 PM2019-01-03T16:34:28+5:302019-01-03T16:35:01+5:30
सामान्यपणे शारीरिक संबंधाबाबत कोणत्याही मुद्द्यावर लोकांची जिज्ञासा अधिक वाढते. खासकरुन तरुणांमध्ये याबाबत खूपकाही जाणून घेण्याची उत्सुकता वाढलेली असते.
(Image Credit : femalemag.com.my)
सामान्यपणे शारीरिक संबंधाबाबत कोणत्याही मुद्द्यावर लोकांची जिज्ञासा अधिक वाढते. खासकरुन तरुणांमध्ये याबाबत खूपकाही जाणून घेण्याची उत्सुकता वाढलेली असते. पण एका रिसर्चनुसार, आता तरुणांचा शारीरिक संबंधातील रस कमी होत आहे. नवीन पिढी पहिल्यांदा शारीरिक संबंध ठेवण्याबाबत फार उत्साही नसतात, ते यासाठी फार काळ वाट बघतात.
१६ हजार लोकांवर अभ्यास
डिपार्टमेंट फॉर एज्युकेशन ऑफ यूनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमध्ये १९८९ ते ९० च्या काळात जन्मलेल्या १६ हजार लोकांचा यात समावेश करण्यात आला होता. रिसर्चमध्ये सहभागी लोकांना १४ वर्षापासून ट्रॅक केलं जात होतं. असं मानलं जातं की, या वयापासून तरुणांना शारीरिक संबंध आणि त्यासंबंधी इतर गोष्टी जशा की, कौमार्य, हस्तमैथून यांसारख्या गोष्टींची माहिती असते.
पहिल्यांदा शारीरिक संबंधासाठी जास्त वाट बघतात
अभ्यासकांनी या सहभागी लोकांच्या २०१६ मध्ये पुन्हा मुलाखती घेतल्या आणि यादरम्यान अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्यात. १६ हजार सहभागी लोकांच्या डेटाचं परीक्षण केल्यावर हे समोर आलं की, पहिल्यांदा शारीरिक संबंध ठेवण्यासाठी आधीची पिढी किती वेळ वाट बघत होती. तर सध्याच्या पिढीतील लोकांमध्ये याबाबत वाढ झाल्याचे बघायला मिळाले. सोबतच २० पैकी १ व्यक्ती २६ वर्षाची होईपर्यंत व्हर्जिन असल्याचं आढळलं.
सोशल मीडियाचं प्रेशर
या अभ्यासानुसार, तरुण पिढीचा शारीरिक संबंधातील रस कमी होत आहे कारण त्यांच्यात जवळीकतेची भीती आहे, सोबतच त्यांना सोशल मीडियाचं प्रेशरही सहन करावं लागतं. तरुणांच्या मनात ही भीती असते की, त्यांच्या शारीरिक संबंधाबाबत फेसबुक, ट्विटर किंवा इन्स्टाग्रामवर कुणी खुलासा तर करणार नाही ना.
तज्ज्ञांनुसार, तरुण पिढी हायपरसेक्शुएलिटीच्या वातावरणात वाढत आहे. आणि त्यांच्याकडे असलेल्या सोशल मीडियाच, पॉर्न व्हिडीओज आणि सिनेमातून त्यांनी मेल मॉडेलला चांगला स्टॅमिना आणि फिमेल मॉडेलला परफेक्ट फीगरमध्ये पाहिलं आहे. अशात आपल्या पार्टनरसमोर शरीराच्या दृष्टीने अपमान किंवा नकाराची भावनाही त्यांच्या मनात घर करुन असते. या कारणानेही ते शारीरिक संबंधातील उत्साह गमावत आहेत.