लैंगिक जीवन : पार्टनरची आणि तुमची कामेच्छा एकसारखी नसेल तर काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2019 03:43 PM2019-07-10T15:43:53+5:302019-07-10T15:48:54+5:30
असं मानलं जातं किंवा अशी सामान्य अपेक्षा असते की, एका कपलची लिबिडो म्हणजेच कामेच्छा एकसारखी असावी. पण अनेकवेळा असं होईलच असं गरजेचं नाही. अशात कपल्सने काय करावं?
एक चांगलं नातं अधिक काल टिकून राहण्यासाठी लैंगिक जीवनही हेल्दी राहणं गरजेचं आहे. असं मानलं जातं किंवा अशी सामान्य अपेक्षा असते की, एका कपलची लिबिडो म्हणजेच कामेच्छा एकसारखी असेल. पण दुर्देवाने काही कपल्सबाबत असं होत नाही. कारण प्रत्येक व्यक्तीची कामेच्छा वेगवेगळी असते. यात फरक असण्याची कारणेही वेगवेगळी असतात. ज्यात स्ट्रेस, वाढतं वय, मुलांचा जन्म आणि आणखीही काही मेडिकल कंडीशन्सचा समावेश करता येऊ शकतो.
बेड सेक्सने होतात समस्या
जर तुमच्या लैंगिक जीवनात काही समस्या असतील आणि या समस्या वेळीच सोडवल्या गेल्या नाही तर तुमच्या नात्यात एक दुरावा निर्माण होऊ शकतो. जे पार्टनर्स लॉन्ग टर्म रिलेशनशिपमध्ये राहतात, त्यांना या समस्येचा अधिक सामना करावा लागतो. जर वेळीच या समस्येवर उपाय केला गेला नाही तर याने व्यक्तीच्या आत्मसन्मानावरही प्रभाव पडतो. अशात जर तुमच्या नात्यात शारीरिक संबंधामुळेही काही समस्या निर्माण होत असतील तर वेळीच या समस्या सोडवण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
शारीरिक संबंधाला प्राधान्य
प्रेम आणि आनंदासोबतच कपल्समध्ये शारीरिक संबंधही तेवढेच महत्त्वाचे आहेत. त्यामुळे याकडे फार दुर्लक्ष करून चालणार नाही. शारीरिक संबंधाला फार महत्त्व न देता दुर्लक्ष करणं नात्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. कपल्सने हे समजून घ्यायला हवं की, एक लैंगिक जीवन चांगलं असणं हे प्रेम आणि विश्वासा एवढंच महत्त्वाचं आहे.
कम्युनिकेशन गरजेचं
कोणत्याही नात्यात कम्युनिकेशन म्हणजेच संवाद सर्वात महत्त्वाचा असतो. खासकरून तेव्हा जेव्हा दोन्ही पार्टनरच्या अपेक्षा एकमेकांपेक्षा वेगळ्या असतात. दोघांनी यावर बोलून मार्ग काढले पाहिजेत. गरजेचं असतं की, दोघांनीही या विषयावर सन्माने बोललं पाहिजे.
योग्य मूड बनवा
सेक्शुअल अॅक्टिविटीला अधिक रोमांचक करण्यासाठी गरजेचं आहे की, तुम्ही तुमचा आणि पार्टनरचा मूड योग्यप्रकारे सेट करा. यासाठी तुम्ही बेडरूममध्ये सुगंधित अरोमॅटिक कॅंडल्स लावा, सॅटिन शीट्स वापरा किंवा शक्य असल्यास बेडरूमच्या बाहेर दुसऱ्या ठिकाणी शारीरिक संबंधाचा आनंद घ्या.