लैंगिक जीवन : 'या' कारणाने लोकांचा शारीरिक संबंधातील घटतोय इंटरेस्ट, वेळीच व्हा सावध!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 03:40 PM2019-05-29T15:40:06+5:302019-05-29T15:42:14+5:30
सध्याच्या लाइफस्टाइलमध्ये वेगवेगळ्या गोष्टींमुळे लैंगिक जीवनाचं नुकसान होत आहे. त्यात आणखी एक गंभीर गोष्टीची भर पडली आहे.
तशी लोकांमध्ये एक ढोबळ धारणा आहे की, इंटरनेट सहजपणे उपलब्ध झाल्यामुळे पॉर्न बघण्याचे अनेक मार्गही खुले झाले आहेत. त्यामुळे लोक शारीरिक संबंधात अधिक रस घेत आहेत. पण खरी परिस्थिती वेगळीच आहे. तज्ज्ञांनुसार, गेल्या काही वर्षात शारीरिक संबंधात लोकांचा इंटरेस्ट कमी झाला आहे आणि हा इंटरेस्ट कमी होण्याला तज्ज्ञ इंटरनेट आणि मॉडर्न लाइफमधील व्यस्तता या गोष्टींना दोष देत आहेत.
रिसर्चमधून धक्कादायक खुलासे
ब्रिटनमध्ये नुकताच एक रिसर्च करण्यात आला. या रिसर्चनुसार, ब्रिटनमधील अर्ध्यापेक्षा अधिक लोक आठवड्यातून एकदा किंवा त्याहूनही कमी शारीरिक संबंध ठेवत आहेत. आणि हे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत जात आहे. लंडन स्कूल ऑफ हायजीन अॅन्ड ट्रॉपिकल मेडिसिनचे अभ्यासकांनुसार, २५ पेक्षा अधिक वयाचे लोक आणि ते ज्यांचं लग्न झालं आहे किंवा लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये आहेत, त्यांच्यात शारीरिक संबंधाची कमरता सर्वात कमी आढळली आहे.
३४ हजार पुरूष-महिलांवर रिसर्च
या रिसर्चमध्ये साधारण ३४ हजार पुरूष आणि महिलांना सहभागी करून घेण्यात आले होते. यांचं वय १६ ते ४४ दरम्यानचं होतं. या रिसर्चच्या डेटामध्ये २००१ ते २०१२ दरम्यान सेक्शुअल अॅक्टिव्हिटीमध्ये आलेल्या कमतरतेची सरासरी आकडेवारी दाखवली गेली. ज्यात सर्वात जास्त कमतरता २५ पेक्षा अधिक वयाच्या लोकांमध्ये आढळून आली. सर्वात अलिकडे करण्यात आलेल्या सर्व्हेनुसार, रिसर्चमध्ये सहभागी ४१ टक्के पुरूष आणि महिलांनी आठवड्यातून एकदा किंवा त्यापेक्षा कमी वेळा शारीरिक संबंध ठेवला.
भलेही हा रिसर्च ब्रिटनमध्ये करण्यात आला. पण भारतात सुद्धा लोक मोफत इंटरनेटमुळे स्मार्टफोनला चिकटून राहतात. त्यामुळे त्यांच्या लैंगिक जीवनावरही याचा प्रभाव पडत असेल यात दुमत नाही. अशात इंटरनेट, स्मार्टफोन, लॅपटॉप, कॉम्प्युटर यापासून जरा अंतर ठेवलं तरच तुमचं लैंगिक जीवन आनंददायी होऊ शकतं.