पार्टनरची सहमती असेल तरच उघडू शकाल 'हे' कंडोमचं पॅकेट!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2019 02:38 PM2019-04-06T14:38:38+5:302019-04-06T14:41:32+5:30

प्रेम संबंधाच्या नात्यात सर्वात महत्त्वाचं काय असतं? तर ती गोष्ट असते तुमची सहमती. जिथे तुमचा सहमतीच नसेल किंवा परवानगीच नसेल तर त्याला शोषण म्हणतात.

Safe sex new consent condom packet will not open unless your partner agrees too | पार्टनरची सहमती असेल तरच उघडू शकाल 'हे' कंडोमचं पॅकेट!

पार्टनरची सहमती असेल तरच उघडू शकाल 'हे' कंडोमचं पॅकेट!

Next

प्रेम संबंधाच्या नात्यात सर्वात महत्त्वाचं काय असतं? तर ती गोष्ट असते तुमची सहमती. जिथे तुमचा सहमतीच नसेल किंवा परवानगीच नसेल तर त्याला शोषण म्हणतात. अर्जेंटिनाच्या कंपनीने हीच गोष्ट डोळ्यांसमोर ठेवून एक कंडोम लॉन्च केला आहे. याचा वापर करण्यासाठी दोन्ही पार्टनरची सहमती असणं सर्वात महत्त्वाचं आहे. कारण या कंडोमचं पॅकेट असं आहे जे एकट्याने उघडताच येणार नाही.

पॅकेट उघडायला चार हात

कंपनीने हा कंडोमच्या जाहिरातीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात दाखवण्यात आलं आहे की, कंडोमचं पॅकेट उघडण्यासाठी चार हातांची गरज आहे. या अनोख्या पॅकेजिंगमध्ये कंडोम विकणाऱ्या कंपनीचं नाव टयूलिपन आहे. कंडोमचं पॅकेट उघडण्यासाठी बॉक्सच्या चारही कोपऱ्यांवर एकत्र दाबावं लागतं. 

कंपनी सुरक्षित संबंधाबाबत या प्रॉडक्टचा प्रचारही याच आधारावर करत आहे. 'लव्ह मेकिंग' मध्ये दोन्ही पार्टनरचा समान सहभाग असतो. कंडोमच्या पॅकेटवर लिहिलं आहे की, 'If it's not a yes, it's a no'. 



 

कधी येणार बाजारात?

कंपनीने सांगितले की, ते आधी त्यांचं हे प्रॉडक्ट प्रमोट करतील, त्यानंतर काही महिन्यांनी ते बाजारात विक्रीसाठी हा कंडोम आणतील. सध्या कंपनी प्रमोशनचा भाग म्हणूण हे कंडोम शहरांमधील बार-कॅफेमध्ये मोफत वाटत आहे. सोशल मीडियातूनही या पॅकेजिंगचं कौतुक केलं जात आहे. 

कंपनीने सांगितले की, 'ट्यूलिपन कंपनीने नेहमीच सुरक्षित शारीरिक संबंध आणि प्लेजरला महत्त्व दिलं आहे. यावेळीही आम्ही या अनोख्या पॅकेटच्या माध्यमातून महत्त्वपर्ण विषय समजावण्याचा प्रयत्न केला आहे. यातून आम्ही हे सांगतोय की, संबंधासाठी दोन्ही पार्टनरची सहमती असावी. 

Web Title: Safe sex new consent condom packet will not open unless your partner agrees too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.