'या' आजारांमुळे लैंगिक जीवनाचे वाजतात तीनतेरा, वेळीच करा उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 04:49 PM2019-05-17T16:49:36+5:302019-05-17T16:51:55+5:30
सगळेच लोक त्यांच्या लैंगिक जीवनापासून पूर्ण आनंदी असतात असं होत नाही. त्याची वेगवेगळी कारणे असतात.
सगळेच लोक त्यांच्या लैंगिक जीवनापासून पूर्ण आनंदी असतात असं होत नाही. त्याची वेगवेगळी कारणे असतात. शारीरिक संबंधाबाबतच्या कोणत्याही समस्येकडे वेळीच लक्ष दिलं नाही तर लैंगिक जीवन निरस होऊ लागतं. त्यामुळे वेळीच याची कारणे शोधणे महत्त्वाचे ठरते. कारण पुढे जाऊन समस्या अधिक बिकट होऊ शकते. लैंगिक समस्या असण्याला आपल्याला असलेले वेगवेगळे आजारही कारणीभूत ठरतात. या आजारांचा लैंगिक जीवनावर फार वाईट परिणाम होऊ शकतो. अशाच काही आजारांबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
१) डायबिटीस - डायबिटीसमुळे आपल्या शरीरात अनेक समस्या होतात. या समस्यांमुळेच शारीरिक संबंध ठेवणे ही समस्या आहे. पुरूषांमध्ये डायबिटीसमुळे इरेक्टाइल डिसफंक्शन ही समस्या होते. तसेच याने कामेच्छाही कमी होत असल्याचे बघायला मिळते.
२) डिप्रेशन - शारीरिक संबंध हे मोकळेपणाने करण्याची प्रक्रिया आहे. पण तुम्ही जर डिप्रेशनचे शिकार असाल तुमचं लैंगिक जीवन याने खराब होऊ शकतं. जर इच्छा नसतानाही शारीरिक संबंध ठेवले तर याने ना तुम्हाला आनंद मिळेल ना तुमच्या जोडीदारा. तसेच इच्छा नसतानाही शारीरिक संबंध ठेवले तर सेक्शुअल डिस्फंक्शन ही समस्या होते.
३) लठ्ठपणा - लठ्ठपणामुळे आपल्या शरीराला वेगवेगळे आजार जाळ्यात घेतात. याचप्रकारे लठ्ठपणा आपल्या लैंगिक जीवनाला फार जास्त प्रभावित करतो. लठ्ठपणा अधिक असेल तर तुम्हाला आणि तुमच्या जोडीदारा अपेक्षित आनंद मिळू शकणार नाही.
४) कंबरदुखी - कंबरदुखी, पाठदुखी आजच्या लाइफस्टाइलमध्ये सामान्य समस्या आहे. शरीरात होणाऱ्या वेदनांमुळे कामेच्छा कमी होऊ लागते. तसेच लोक वेदनांमुळे लोक शारीरिक संबंध पूर्णपणे एन्जॉय करू शकत नाहीत. तसं पहायला गेलं तर एनीमियासारख्याच कंबरदुखी, बॅक पेन सुद्धा प्रत्यक्ष रूपाने लैंगिक जीवनाला प्रभावित करत नाही.
५) एनीमिया - एनीमियाने भलेही लैंगिक जीवन प्रत्यक्षपणे प्रभावित होत नसलं, तरी सुद्धा एनीमियामुळे शरीरात येणारी कमजोरी तुमची कामेच्छा कमी करते. महिला असो वा पुरूष एनीमियामुळे कामेच्छा कमी होते. असं पाहिलं जातं की, एनीमियामुळे पुरूषांमध्ये इरेक्टाइल डिस्फंक्शनची समस्या होऊ लागते.
६) वॅस्कुलर डिजीज - वॅस्कुलर डिजीज असेल तर आपल्या जननांगांमध्ये ब्लड सर्कुलेशन योग्यप्रकारे होऊ शकत नाही. त्यासोबतच ब्लड प्रेशर इत्यादी समस्या होऊ लागते. या समस्येमुळे ब्लड फ्लो योग्य राहत नाही आणि उत्तेजना कमी होते.
७) मोनोपॉज - महिलांमध्ये मेनोपॉजमुळे त्यांची कामेच्छा कमी होऊ लागते. मोनोपॉजदरम्यान महिलांच्या शरीरात बरेच हार्मोन्स बदल होतात. त्यामुळे महिलांची क्षमता घटू लागते. त्यामुळेच त्यांची कामेच्छा कमी होते.