जिमला जाण्यापूर्वी शारीरिक संबंध ठेवणं चांगलं की वाईट?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 03:44 PM2018-12-19T15:44:58+5:302018-12-19T15:47:10+5:30
तुम्ही जर फिटनेसबाबत फार जागरुक असाल आणि तुम्हाला कधी विचार आला असेल की, जिमला जाण्याआधी शारीरिक संबंध ठेवणे योग्य की अयोग्य?
तुम्ही जर फिटनेसबाबत फार जागरुक असाल आणि तुम्हाला कधी विचार आला असेल की, जिमला जाण्याआधी शारीरिक संबंध ठेवणे योग्य की अयोग्य? तर याबाबत नुकताच एका रिसर्चमधून खुलासा करण्यात आला आहे. या रिसर्चमधून हे सांगण्यात आले आहे की, जिमला जाण्याआधी शारीरिक संबंध ठेवल्याने मसल्सवर कोणताही विशेष प्रभाव पडत नाही. चला जाणून घेऊ याबाबत आणखी काही गोष्टी...
काय सांगतो अभ्यास?
एका हेल्थ वेबसाइटने प्रकाशित केलेल्या या रिसर्चमधून जुन्या धारणांना बदलून टाकलं आहे. कॅलिफोर्निया स्टेट यूनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी याबाबत एक रिसर्च केला. यात १२ लोकांचा समावेश करण्यात आला होता. या लोकांनी रात्री शारीरिक संबंध ठेवले आणि सकाळी ते जिमला वर्कआउट करण्यासाठी गेले.
काय झाला प्रभाव?
यातून अभ्यासकांना आढळलं की, या १२ लोकांच्या क्षमतेवर शारीरिक संबंधाचा कोणताही प्रभाव पडला नाही. त्यांनी जिममध्ये वजन उचलण्यापासून ते सर्वप्रकारच्या एक्सरसाइजमध्ये त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण आली नाही. या रिसर्चमधून हेही समोर आलं की, जर तुम्ही शारीरिक संबंध ठेवण्यानंतर १२ तासातही जिममध्ये गेलात, तरी तुमच्यावर याचा काहीही प्रभाव पडत नाही.
प्रत्येकाला ही गोष्ट लागू पडतं का?
हे गरजेच नाहीये की, रिसर्चमध्ये सांगण्यात आलेल्या सर्वच गोष्टी प्रत्येक व्यक्तीवर लागू पडेल. अनेकदा या गोष्टी व्यक्तीच्या शारीरिक क्षमतेवरही अवलंबून असतात. कारण व्यक्तीची लैंगिक क्षमता ही त्याच्या टेस्टोस्टेरॉन हार्मोन्सवर निर्भर असते. जी वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये वेगवेगळी असते.