लैंगिक जीवन अॅक्टिव असेल तर Heart Attack ने मृत्युचा धोका कमी!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 03:19 PM2019-08-13T15:19:42+5:302019-10-07T15:55:37+5:30
लैंगिक जीवनाबाबत अलिकडे वेगवेगळे रिसर्च सतत केले जातात. अशाच एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, तुमचं लैंगिक जीवन आणि हार्ट अटॅक यात खोलवर संबंध आहे.
लैंगिक जीवनाबाबत अलिकडे वेगवेगळे रिसर्च सतत केले जातात. अशाच एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, तुमचं लैंगिक जीवन आणि हार्ट अटॅक यात खोलवर संबंध आहे. जर तुमचं लैंगिक जीवन सुरळीत असेल तर तुम्हाला हार्ट अटॅक येऊन मृत्युचा धोका कमी राहतो.
युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या अभ्यासकांनी याचा खुलासा केला की, ज्या लोकांचं लैंगिक जीवन आनंदी आहे किंवा सुरळीत सुरू आहे. त्यांना पहिल्या हार्ट अटॅकने मृत्यू येण्याचा धोका सिंगल आणि अविवाहित लोकांपेक्षा कमी असतो.या रिसर्चमध्ये अभ्यासकांनी ११२० पुरूष आणि महिलांना सहभागी करू घेतले होते. यातील लोकांना ६५ वयात किंवा त्यापेक्षा कमी वयात पहिला हार्ट अटॅक आला होता.
साधारण २२ वर्ष चाललेल्या या रिसर्चमध्ये सहभागी लोकांवर लक्ष ठेवलं गेलं आणि रिसर्च दरम्यान ११२० मधील ५२४ लोकांचा मृत्यू झाला. ज्या लोकांनी हार्ट अटॅक येण्याच्या १ वर्षाआधीपर्यंत अजिबात शारीरिक संबंध ठेवले नव्हते, त्यांचा मृत्युचा धोका २७ टक्के अधिक होता. तर आठवड्यातून एकापेक्षा जास्तवेळ शारीरिक संबंध ठेवला त्यांना हा धोका कमी होता. त्यासोबतच ज्या लोकांनी आठवड्यातून कमीत कमी एकदा शारीरिक संबंध ठेवला, त्यांचा हार्ट अटॅकने मृत्युचा धोका १२ टक्के कमी होता.
हेल्दी राहतात सेक्शुअली अॅक्टिव लोक
शारीरिक संबंध आणि जिवंत राहण्याची शक्यता याचं कनेक्शन त्या लोकांसाठी अधिक स्ट्रॉंग होता, ज्यांचं लैंगिक जीवन हार्ट अटॅकनंतरही खूप अॅक्टिव होतं. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमध्ये डिपार्टमेंट ऑफ बिहेविअरल सायन्स अॅन्ड हेल्थचे मुख्य Andrew Stepto म्हणाले की, यात हैराण होण्यासारखं काही नाही.
हाय बीपी, कोलेस्ट्रॉल आणि डायबिटीसचा धोका
जे लोक सेक्शुअली अॅक्टिव नव्हते म्हणजे ज्यांनी शारीरिक संबंध ठेवणे बंद केले होते. त्यांच्यात हार्ट अटॅक येण्याच्या १ वर्षाआधी हाय ब्लड प्रेशर, हाय कोलेस्ट्रॉल, डायबिटीससहीत अनेक आजार आणि समस्या आढळल्यात. या समस्या आठवड्यातून कमीत कमी एकदा शारीरिक संबंध ठेवणाऱ्यांमध्ये कमी आढळल्या.