लैंगिक जीवन : परफॉर्मन्स डाऊन होऊ द्यायचा नसेल 'हे' पदार्थ खाण्याची सवय सोडा!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 02:57 PM2020-01-10T14:57:30+5:302020-01-10T15:25:42+5:30
अलिकडे तरूण वयात अनेकांना वेगवेगळ्या लैंगिक समस्यांचा सामना करावा लागतो आहे. बदलत्या लाइफस्टाईलचा वाईट प्रभाव लोकांच्या सेक्सुअल लाइफवर पडतोय.
अलिकडे तरूण वयात अनेकांना वेगवेगळ्या लैंगिक समस्यांचा सामना करावा लागतो आहे. बदलत्या लाइफस्टाईलचा वाईट प्रभाव लोकांच्या सेक्सुअल लाइफवर पडतोय. मग त्यात खाण्याच्या काही सवयींचाही समावेश आहे. तुम्ही जर आर्टिफिशिअल स्वीटनर्सचा वापर करत असाल वेळीच बंद करा. कारण याने तुमची सेक्शुअल लाइफ अडचणीत येऊ शकतं.
आर्टिफिशिअल स्वीटनर्सच्या सेवनाने शरीरात सेराटोनिन हार्मोन्सचं प्रमाण प्रभावित होतं. हे हार्मोन्स आनंद देणारे हार्मोन्स असतात. एक्सपर्ट्सनुसार, हे आर्टिफिशिअल स्वीटनर्स सेराटोनिनचं प्रमाण कमी करू शकतात. जर शरीरात या हार्मोन्स प्रमाण असंतुलित झालं किंवा कमी झालं तर याचे लो लिबिडो म्हणजे कामेच्छा कमी होण्याची समस्या होऊ शकते. इरेक्टाइल डिस्फंक्शन आणि परफॉर्मन्स एंक्जायटीसारखी समस्याही आर्टिफिशिअल स्वीटनर्समुळे होऊ शकते.
अनेकजण तोंडाची दुर्गंधी घालवण्यासाठी आर्टिफिशिअल स्वीटनर्स असलेली च्युइंगम किंवा मिंटच्या गोळ्या खातात. सामान्यपणे टॉफी किंवा माउथ फ्रेशनर्ससारख्या पदार्थांमध्ये गोडव्यासाठी ऐस्परटेम नावाचं तत्व वापरलं जातं. याच तत्वामुळे सेक्शुअल हेल्थ प्रभावित होऊ शकते. त्यामुळे याच नियमित सेवन करणं तुमच्या सेक्शुअल लाइफसाठी नुकसानकारक आहे.
(Image Credit ; healthline.com)
तुम्हाला जर काही गोड खाण्याची इच्छा झाली तर काही हेल्दी स्वीटनर्सचा वापर करा. जसे की, जेवण झाल्यावर काही गोड खाण्याची सवय इच्छा झाली तर मध किंवा गूळाचा छोटा तुकडा खावा. त्याचप्रमाणे माउथ फ्रेशनर म्हणून बडीशेपही खाऊ शकता. इतकेच नाही तर पुदीन्याच्या ताज्या पानांनीही चांगलं वाटेल.