लैंगिक जीवन : वर्किंग वुमन्ससाठी बेस्ट टिप्स, ज्या बदलतील तुमचं जीवन!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 04:01 PM2019-12-18T16:01:53+5:302019-12-18T16:04:29+5:30

'डबल इन्कम, नो किड्स' नंतर आता 'डबल इन्कम नो सेक्स'चा ट्रेन्ड वाढतोय. वेळेची कमतरता, आर्थिक गरज आणि प्रसिद्धीच्या गरजेचा सर्वात जास्त प्रभाव आपल्या जवळच्या नात्यांवर पडतो आहे.

Sex Life: Best sex guide for working women | लैंगिक जीवन : वर्किंग वुमन्ससाठी बेस्ट टिप्स, ज्या बदलतील तुमचं जीवन!

लैंगिक जीवन : वर्किंग वुमन्ससाठी बेस्ट टिप्स, ज्या बदलतील तुमचं जीवन!

Next

'डबल इन्कम, नो किड्स' नंतर आता 'डबल इन्कम नो सेक्स'चा ट्रेन्ड वाढतोय. वेळेची कमतरता, आर्थिक गरज आणि प्रसिद्धीच्या गरजेचा सर्वात जास्त प्रभाव आपल्या जवळच्या नात्यांवर पडतो आहे. सीमा ओलांडून महिलांनी आपली ओळख निर्माण करण्याकडे पावले तर टाकली आहेत, पण त्या बदल्यात त्यांची नाती अडचणीत येत आहेत. अशात अनेक महिलांच्यालैंगिक जीवनात अनेक समस्या येऊ लागल्या. त्यावर काही टिप्स आम्ही देत आहोत.

शारीरिक संबंधाला महत्व

वैवाहिक जीवनात प्रेम आणि विश्वासासोबत शारीरिक संबंधाचीही तेवढीच गरज असते. वेगवेगळ्या रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, लग्ने तुटण्याचं एक मुख्य कारण लैंगिक जीवनातील समस्या आहे. अशात शारीरिक संबंधाच्या महत्वाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. महिला दुसऱ्या ठिकाणी काम करत असल्याने त्यांचं लैंगिक जीवन प्रभावित झालं आहे. अशात आपलं लैंगिक जीवन नेहमी ताजतवाणं ठेवणं गरजेचं आहे. 

डिप्रेशनवर मात करा

लॉस एन्जेलिसच्या सिडार्स सिनाए मेडिकल सेंटरचे एमडी एंडोक्रिनोलॉजिस्ट आणि मेडिसिन विभागाचे अध्यक्ष ग्लेन डी. ब्राउन्स्टेन यांच्यानुसार, महिलांची सेक्स ड्राइव्ह मल्टीडायमेंशनल असते. सेक्स भलेही शारीरिक क्रिया असेल, पण महिलांसाठी ही गोष्ट भावनिक देखील असते. कोणताही मुद्दा त्यांचं लैंगिक जीवन प्रभावित करू शकतो. त्यामुळे जर नोकरी करणाऱ्या महिलांना ऑफिसमध्ये काही अडचण असेल तर त्या समस्या घरापर्यंत येऊ देता कामा नये. जर काही अडचण, समस्या असेल तर पतीसोबत त्यावर बोला. शारीरिक संबंधाने स्ट्रेस, डिप्रेशन दूर होण्यासही मदत मिळते.

फिटनेसही गरजेची

Why do men some men have breast milk fetish | <a href=

भावनात्मक संतुलनासाठी फिजिकल फिटनेसही गरजेची असते. तज्ज्ञ सांगतात की, जर तुम्ही शारीरिक रूपाने फिट नसाल तर तुम्हाला लैंगिक जीवनात फारसा उत्साह राहणार नाही. खासकरून महिला शारीरिक संबंधावेळी त्यांचं शरीर आणि लुक्सबाबत फार कॉन्शिअस राहतात. त्यामुळे स्वत:ला फिट ठेवणं गरजेचं आहे. जिम जायला वेळ नसेल तर घरीच हलक्या एक्सरसाइज सुरू करा. 

काय खावं, काय खाऊ नये?

खाण्याचा शारीरिक संबंधाशी काय संबंध? असा तुमचा विचार असेल तर तो चुकीचा आहे. लैंगिक जीवनात आहाराला फार महत्व आहे. त्यामुळे नोकरी करणाऱ्या महिलांनी त्यांच्या डाएटचं व्यवस्थित नियोजन करावं. नोकरी करणाऱ्या महिलांचं खाणं-पिणं नेहमीच अनियमित होतं. जेव्हा जे मिळेल ते खाल्लं जातं. याने लैंगिक जीवन प्रभावित होतं. कारण हेल्दी डाएटचा संबंध शारीरिक ऊर्जा आणि शक्तीशी आहे. ज्या लैंगिक जीवनात महत्वाची भूमिका बजावतात. 

दर वीकेंडला हनीमून

Experiencing low sex drive improve it naturally | <a href=

आठवडाभर तुम्ही दोघेही बिझी राहात. पण वीकेंडला तुम्ही असं काही करू शकता की, आठवडाभराचा स्ट्रेस दूर होईल आणि तुम्ही काही खास क्षण सोबत घालवू शकता. एका रिसर्चनुसार, एका हनीमूनऐवजी छोटे-छोटे हनीमून तुमचं नातं आणखी मजबूत करू शकतात. वीकेंडला एकतर जवळपास फिरायला जाऊ शकता, सिनेमाला जाऊ शकता किंवा बाहेर जेवायला जाऊ शकता. 

पतीची साथ गरजेची

तुमच्या पार्टनरला सुद्धा याची जाणीव व्हायला पाहिजे की, भावनात्मक स्तरावर महिलांना दिवसभर छोट्या-छोट्या गोष्टी प्रभावित करत असतात. ज्याचा त्यांच्या लैंगिक जीवनावर प्रभाव पडतो. अशात पुरूषांनी सुद्धा पत्नी नोकरी करणारी असेल तर त्यांनी मदत करावी. पतीच्या सपोर्टने तुमचं नातं आणखी मजबूत होतं.


Web Title: Sex Life: Best sex guide for working women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.