लैंगिक जीवन : मासिक पाळीत शारीरिक संबंध ठेवले तर गर्भधारणा होते का?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 02:58 PM2020-02-13T14:58:50+5:302020-02-13T15:00:55+5:30
महिला आणि मुलींमध्ये मासिक पाळी आणि गर्भधारणेबाबत सर्वात कॉमन असलेला गैरसमज हा आहे की, मासिक पाळी सुरू असताना शारीरिक संबंध ठेवले तर गर्भधारणा होत नाही.
महिला आणि मुलींमध्ये मासिक पाळी आणि गर्भधारणेबाबत सर्वात कॉमन असलेला गैरसमज हा आहे की, मासिक पाळी सुरू असताना शारीरिक संबंध ठेवले तर गर्भधारणा होत नाही. मासिक पाळीदरम्यान गर्भधारणेची शक्यता कमी राहते किंवा अजिबात राहत नाही किंवा शक्य नाही असं नाही. सोप्या शब्दात सांगायचं तर जर मासिक पाळीवेळी अनप्रोटेक्टेड शारीरिक संबंध ठेवले तर गर्भधारणेचा धोका राहतो.
गर्भधारणा होते कशी?
आधी हे जाणून घेणं फार गरजेचं आहे की, गर्भधारणेची प्रक्रिया अखेर होते कशी? पुरूषांचे स्पर्म जेव्हा महिलेच्या अंडासोबत जुळतात तेव्हा गर्भधारणा होते हे तुम्हाला माहीत असेल. पण याच्या पूर्ण प्रक्रियेबाबत सांगायचं तर महिलेच्या ओव्हरीमधून अंडी(स्त्रीबीजे) निघतात जी केवळ १२ ते २४ तासांपर्यंत शरीरात जिवंत राहतात. पण पुरूषांचे स्पर्म ३ ते ५ दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतात. सामान्यपणे प्रत्येक महिलेची मासिक पाळीची सायकल ही २८ दिवसांची असते आणि ओव्ह्यूलेशन म्हणजे अंड रिलीज होण्याची प्रक्रिया १२, १३, १४ दिवसाच्या आसपास होते. यादरम्यान जर स्त्रीबीजे म्हणजेच अंड आणि स्पर्म एकत्र झाले तर गर्भधारणा होते.
मासिक पाळी दरम्यान गर्भधारणा कशी होते?
अनेक महिलांमध्ये ओव्ह्यूलेशन दरम्यान ब्लीडिंग होते किंवा अनेकदा व्हजायनल ब्लीडिंगला सुद्धा महिला मसिक पाळी समजण्याची चूक करतात. अशात जर असा विचार करून की, मासिक पाळी सुरू आहे आणि प्रोटेक्शन न वापराताही शारीरिक संबंध ठेवला जावा तर गर्भधारणा होण्याची शक्यता अधिक राहते. त्यासोबतच आणखी एक बाब आहे ज्यावर लक्ष दिलं पाहिजे. पुरूषांकडून इजॅक्यूलेशननंतर स्पर्म ३ दिवस म्हणजे ७२ तासांपर्यंत महिलेच्या शरीरात जिवंत राहू शकतात. अशात जर मासिक पाळी संपण्याच्या दिवसात प्रोटेक्शन न वापरता शारीरिक संबंध ठेवले तर गर्भधारणेही शक्यता अधिक राहते.