लैंगिक जीवन : शारीरिक संबंधानंतर चुकूनही खाऊ नका 'हे' पदार्थ, अन्यथा....
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 04:05 PM2019-09-30T16:05:43+5:302019-09-30T16:11:09+5:30
अनेक रिसर्चमधून समोर आलं आहे की, शारीरिक संबंध ठेवणं ही एक परिपूर्ण एक्सरसाइज आहे. ज्याने कॅलरी बर्न होतात. तुम्ही ३० मिनिटांच्या कालावधीत १५० पर्यंत कॅलरी बर्न करू शकता.
अनेक रिसर्चमधून समोर आलं आहे की, शारीरिक संबंध ठेवणं ही एक परिपूर्ण एक्सरसाइज आहे. ज्याने कॅलरी बर्न होतात. तुम्ही ३० मिनिटांच्या कालावधीत १५० पर्यंत कॅलरी बर्न करू शकता. हेच कारण आहे की, काही लोकांना शारीरिक संबंधानंतर भूक लागते. पण असे अनेक पदार्थ आहेत, जे शारीरिक संबंधानंतर खाल्ले तर तुमच्या आरोग्याचं नुकसान होऊ शकतं.
पिझ्झा
एक्सपर्ट्सनुसार, रिफाइन्ड फ्लोरपासून तयार केलेला पिझ्झा आणि त्यावरील चीजच्या कॉम्बिनेशनमुळे पचनक्रिया बिघडू शकते. सामान्यपणे शारीरिक संबंधानंतर इतर वेळेपेक्षा बीपी थोडा हाय असतो. अशात जर हेवी पदार्थ खाल, तर पोटावर प्रेशर येतं आणि याने पोट खराब होतं.
कॉफी किंवा चहा
एक्सपर्ट असा सल्ला देतात की, शारीरिक संबंधानंतर झोप घेतली पाहिजे, जेणेकरून शरीर आणि मेंदूला रिलॅक्स होण्यास मदत मिळेल. जर शारीरिक संबंधानंतर कॉफी किंवा चहाचं सेवन केलं तर झोप येणार नाही. ज्यामुळे तुम्हाला थकवा आणि डोकेदुखीची समस्या होऊ शकते.
चिप्स
चिप्स प्रोसेस्ड, फ्राइड आणि हाय लेव्हल सोडियमयुक्त असतात. याने बीपीसोबतच ब्लड शुगर लेव्हलवर प्रभाव पडतो. जर तुम्हाला बीपीची जराही समस्या असेल तर शारीरिक संबंधानंतर चिप्स अजिबात खाऊ नका. असं कराल तर महागात पडू शकतं.
चीज
चीज हे सोडियमयुतक्त असतं, तसेच त्यात फॅटचं प्रमाणही अधिक असतं. शारीरिक संबंधानंतर शरीर थकव्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत असतं, अशात जर तुम्ही चीज खाल, तर याने पोटावर प्रेशर वाढतं आणि पचनक्रिया संबंधी समस्या होऊ लागतो.
मद्यसेवन
शारीरिक संबंधानंतर मद्यसेवन अजिबात करू नये. याने मेटाबॉलिज्म स्लो होतं. ज्यामुळे तुम्हाला जास्त थकवा जाणवू शकतो किंवा चक्करही येऊ शकते.