लैंगिक जीवन : एकच एक पद्धत वापरल्यास काय होतं?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2019 03:39 PM2019-01-02T15:39:11+5:302019-01-02T15:45:42+5:30
अनेकदा काही लोक हे शारीरिक संबंध ठेवताना एक खास रुटीन फॉलो करतात आणि तेच रोज पुन्हा पुन्हा फॉलो करतात.
अनेकदा काही लोक हे शारीरिक संबंध ठेवताना एक खास रुटीन फॉलो करतात आणि तेच रोज पुन्हा पुन्हा फॉलो करतात. पण असं करणं त्यांच्या लैंगिक जीवन अडचणीत टाकण्यासारखं आहे. असं केल्याने तुम्हाला शारीरिक संबंधाप्रति लवकर कंटाळा येईल. हे रोज करत असलेल्या एखाद्या कामाप्रमाणे होईल आणि याने तुमच्या नात्यात दरी निर्माण होण्याचीही शक्यता असते. तसेच दोघांचीही कामेच्छाही कमी होऊ शकते.
त्यामुळे हे गरजेचं आहे की, तुमची रोजची कंटाळवाणी पद्धत बदला आणि रोज काहीतरी नवीन करा. पण तुम्हाला याबाबत फारशी माहिती नसेल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या. त्याशिवाय काहीही मनात येईल तसं वागू नका. उत्साह वाढवण्यासाठी तुम्ही नव्या पोझिशन्स वापरा. याने तुमची लैंगिक क्रिया आणखी रोमांचक आणि उत्साही होईल. महिलांना सरप्राइज फार आवडतात, त्यामुळे तुम्ही जितका तुमच्यात बदल कराल तितका आनंद तुमच्या जोडीदाराला मिळेल.
शारीरिक संबंध ठेवण्याचा असा काही खास ठरलेला वेळ नसतो. गरज असते ती केवळ इच्छेची. त्यामुळे योग्य वेळेची वाट बघत वेळ वाया घालवू नका. वेगळं काही करुन जोडीदार तुमच्या इतकाच उत्तेजित होईल. त्यामुळे दोघांनाही आनंद मिळेल. यासाठी तुम्ही फोरप्लेने सुरुवात करु शकता. चुंबन याचं सर्वात चांगलं ऑप्शन आहे. याने दोघांचं नातंही मजबूत होते. एकमेकांना असलेली एकमेकांची काळजी यातून दिसते. तसेच महिला चुंबनाने लवकर उत्तेजित होतात.
त्यासोबतच काही महिलांना मासिक पाळीदरम्यान शारीरिक संबंध ठेवण्याची तीव्र इच्छा होते. जर तुम्ही मासिक पाळीदरम्यान शारीरिक संबंध ठेवणार असाल तर त्यांच्या स्तनांची खास काळजी घ्या, कारण या दिवसात स्तन अधिक संवेदनशील होतात.
तसेच शारीरिक संबंध ठेवताना जर महिला जोडीदाराच्या आवडी-निवडीबाबत विचारलं तर ही गोष्टही उत्साह वाढवण्यासाठी फायदेशीर ठरु शकते. कारण सामान्यपणे पुरुष जे करतात त्यावर महिला समाधान मानतात. त्या त्यांना हव्या असलेल्या गोष्टी सांगत नाहीत. अशात त्यांना काही विचारणा केली तर लैंगिक जीवन अधिक सुखकर होऊ शकतं.