लैंगिक जीवन : मद्यसेवनामुळे कामेच्छा खरंच कमी होते का? वाचा तज्ज्ञांचं मत..

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2021 04:26 PM2021-01-29T16:26:11+5:302021-01-29T17:04:02+5:30

शेक्सपीअरने आपल्या मॅकबेथ नाटकात मद्याबाबत असं लिहिलं आहे की, मद्याने काम इच्छा तर भडकते, पण 'काम' बिघडतं. 

Sex life : does alcohol affect sex drive? | लैंगिक जीवन : मद्यसेवनामुळे कामेच्छा खरंच कमी होते का? वाचा तज्ज्ञांचं मत..

लैंगिक जीवन : मद्यसेवनामुळे कामेच्छा खरंच कमी होते का? वाचा तज्ज्ञांचं मत..

googlenewsNext

आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेक लोकांना लैंगिक जीवनासंबंधी वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. काहींना कामेच्छा कमी होणे, उत्तेजना न होणे, शरीरसुखात मन न लागणे, इच्छा न होणे, जास्त वेळ टिकता न येणे अशा कितीतरी समस्या येत आहे. याबाबत तज्ज्ञांचे सल्ले आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. 

प्रश्न - माझं वय ५० वर्षे आहे. मला आधी मद्यसेवनाची वाईट सवय होती. सायंकाळ होताच मी नशेत बुडून जायचो. गेल्या तीन महिन्यांपासून मी मद्यसेवन करत नाहीये. पण मला असं जाणवत आहे की, माझी उत्तेजना काही कमी होऊ लागली आहे. हा माझा गैरसमज आहे का?

या प्रश्नावर एनबीटीवर एका डॉक्टरांनी दिलेलं उत्तर पुढीलप्रमाणे आहे.  'असं म्हणतात की, अगदी कमी प्रमाणात मद्यसेवन केलं तर व्यक्तीच्या चिंता दूर होता आणि अशात तो अधिक आत्मविश्वासाने पार्टनरसोबत शारीरिक संबंध ठेवू शकतो. पण मद्याचं प्रमाण जास्त झालं की, व्यक्तीला झालेली उत्तेजनाही निघून जाते. सतत मद्यसेवन केल्याने व्यक्तीच्या नर्वस सिस्टमवर वाईट परिणाम होतो. ज्यामुळे व्यक्तीमध्ये नपुंसकता येऊ शकते. त्याचे सेक्स ड्राइव्ह म्हणजेच कामेच्छा कमी होऊ लागते'.

इतकेच नाही तर सतत मद्यसेवन केल्याने लिव्हरही खराब होतात. याने कामेच्छा आणि कामशक्ती दोन्हींवर वाईट परिणाम होतो. मद्यसेवनामुळे शरीरातील पेल्विक भागावर(पोटाखालचा भाग) वाईट परिणाम होतो. ज्यामुळे सेक्स हार्मोन्सही कमी होतात. शेक्सपीअरने आपल्या मॅकबेथ नाटकात मद्याबाबत असं लिहिलं आहे की, मद्याने काम इच्छा तर भडकते, पण 'काम' बिघडतं. 

यादरम्यान तुम्ही चांगला पौष्टिक आहार घेण्यावर भर द्या. वेगवेगळ्या हिरव्या पालेभाज्या खा. डॉक्टरांच्या सल्ल्याने काही औषधेही घेऊ शकता. या उपयांनी तुम्हाला नक्कीच फायदा होईल. हे करत असताना मद्यसेवन पुन्हा सुरू करू नका. नाही तर तुमचं लैंगिक जीवन नेहमीसाठी अडचणीत येऊ शकतं.
 

Web Title: Sex life : does alcohol affect sex drive?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.