लैंगिक जीवन : हस्तमैथुन केल्याने खरंच डोळ्यांवर वाईट प्रभाव पडतो का?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2020 04:42 PM2020-02-04T16:42:02+5:302020-02-04T16:42:07+5:30
अनेकजण याला चुकीचं मानतात. पण तज्ज्ञ सांगतात की, यात चुकीचं काही नसून ही एक नैसर्गिक क्रिया आहे. तसेच आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
हे सर्वांनाच माहीत आहे की, हस्तमैथुनाबाबत कुणीही मोकळेपणाने बोलत नाहीत. वास्तविक पाहता जास्तीत जास्त लोक हस्तमैथुन करतात, पण यावर बोलायला लाजतात. तसेच याबाबत लोकांमध्ये अनेक गैरसमजही असतात. अनेकजण याला चुकीचं मानतात. पण तज्ज्ञ सांगतात की, यात चुकीचं काही नसून ही एक नैसर्गिक क्रिया आहे. तसेच आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पण प्रमाण अधिक असू नये.
हस्तमैथुनाबाबत लोकांमध्ये एक असा गैरसमज आहे की, हस्तमैथुन केल्याने शारीरिक कमजोरी येते आणि याचा डोळ्यांवरही वाइट परिणाम होतो. यावर तज्ज्ञ सांगतात की, हस्तमैथुनामुळे तुमच्या लैंगिक जीवनावर प्रभाव पडू शकतो, पण याचा शरीराच्या कोणत्याही अवयवावर कोणताही वाईट प्रभाव पडत नाही.
आरोग्यासाठी किती नुकसानकारक हस्तमैथुन?
हस्तमैथुनाचा आरोग्यावर वाईट प्रभाव पडतो हा केवळ एक गैरसमज आहे. हस्तमैथुनाने आंधळेपणा किंवा वेडसरपणा येत नाही. हे केल्याने ना डोळ्यांची दृष्टी जात. याने शरीराच्या कोणत्याही अवयवाच्या विकासात अडथळा येत नाही.
याउलट हस्तमैथुन केल्याने तुमचा मानसिक तणाव कमी होतो आणि शरीरात आनंद देणारे हार्मोन्स इंडॉर्फिनचं प्रमाण वाढतं. याने तुम्हाला चांगली झोप येण्यास मदत होते आणि सोबतच तुमचा प्रायव्हेट पार्ट अॅक्टिवही राहतो. याला तर तज्ज्ञ सुरक्षित सेक्सची सर्वात चांगली पद्धत मानली आहे.
गैरसमज
डॉ. मायकल एशवर्थ यांच्यानुसार, ते याबाबत लोकांकडून वेगवेगळे गैरसमज ऐकत असतात. ज्यात हैस्तमैथुनाने आंधळेपणा येणे, तळहातावर केस येणे किंवा एखादा मानसिक आजार होत असल्याचे गैरसमज ते ऐकत असतात.
महिलांसाठी सुरक्षित पद्धत
पुरूषांच्या तुलनेत एक तृतियांश महिलांना हस्तमैथुनाची सवय आढळून आली आहे. ज्यातील जास्तीत जास्त महिला त्यांच्या प्रायव्हेट पार्टसाठी एखादी वस्तू वापरतात. पण त्यांनी असं अजिबात करू नये. त्यांनी स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे. कारण त्या वस्तूसोबत बॅक्टेरियाही प्रायव्हेटमध्ये शिरतात आणि याने इन्फेक्शन होऊ शकतं.