लैंगिक जीवन : इरेक्टाइल डिस्फंक्शनशी संबंधित गैरसमज...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 03:07 PM2019-10-01T15:07:25+5:302019-10-01T15:07:52+5:30
इरेक्टाइल डिस्फंक्शन(ताठरता न येणे) एक अशी समस्या आहे, ज्यात पुरूष इंटरकोर्स दरम्यान इरेक्शनला मेंटेन ठेवू शकत नाही.
इरेक्टाइल डिस्फंक्शन(ताठरता न येणे) एक अशी समस्या आहे, ज्यात पुरूष इंटरकोर्स दरम्यान इरेक्शनला मेंटेन ठेवू शकत नाही. लैंगिक जीवनासोबतच याने अनेकांच्या आरोग्यावरही वाईट प्रभाव पडतो. पण या समस्येबाबत काही लोकांमध्ये काही गैरसमज आहेत, या गैरसमजांनाच लोक सत्य मानतात. आणि त्याकारणानेच ते यावर उपचार करण्यासही घाबरतात. चला जाणून घेऊ इरेक्टाइल डिस्फंक्शनबाबत मिथ्य आणि सत्य...
याने लैंगिक जीवन संपतं
हा एक मोठा गैरसमज आहे. जर एखाद्या पुरूषाला इरेक्शनची समस्या असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ती व्यक्ती काही मेडिसिन घेऊ शकते. याने तुमची ही समस्या दूर होण्यास मदत होऊ शकते. काही थेरपींच्या माध्यमातूनही ही समस्या दूर केली जाऊ शकते.
फक्त पुरूषांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये समस्या...
असं अजिबात नाहीये. काही लोक हीच चूक करतात. पण मुळात इरेक्शन याकडे इशारा करतं की, पुरूषांच्या गुप्तांगाशिवायही शरीराच्या इतर भागात काही समस्या होऊ शकते. त्यामुळे वेळ न घालवता लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
सिगारेटने प्रायव्हेटला काही होत नाही
हा एक फार मोठा गैरसमज आहे. तुमच्या वेगवेगळ्या सवयींसोबतच सिगारेट पिण्यानेही तुमच्या प्रायव्हेट पार्टवर वाईट प्रभाव पडतो. सिगारेट ओढल्याने मेल प्रायव्हेट पार्टच्या ब्लड वेसल्स(नसा) नष्ट होतात. त्यामुळे त्या भागात योग्य प्रमाणात ब्लड फ्लो होत नाही आणि यामुळे ताठरता म्हणजेच इरेक्शन होऊ शकत नाही.
टाइट अंडरवेअरने समस्या
एक असाही समज आहे की, टाइट अंडरवेअर घातल्याने पुरूषांना इरेक्टाइल डिस्फंक्शनच्या समस्येचा सामना करावा लागतो. पण हे खरं नाहीये. जास्त टाइट अंडरवेअर घातल्याने फर्टिलिटीवर नकारात्मक प्रभाव पडतो.
केवळ वृद्धांना होते ही समस्या
असं अजिबात नाहीये. वाढत्या वयासोबत इरेक्शनची समस्या होऊ लागते हे मान्य. पण असं अजिबात नाही की, ही समस्या केवळ वय वाढल्यावरच होते. अनेकदा असंही असतं की, वय वाढल्यावरही अनेक पुरूष त्यांचं लैंगिक जीवन एन्जॉय करत असतात.