लैंगिक जीवन : एक्सपायर्ड कंडोमचा वापर ठरू शकतो घातक, जाणून घ्या कारण....
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 16:13 IST2021-02-10T16:12:52+5:302021-02-10T16:13:51+5:30
Sexual Health : अनेकजण कंडोम(Condom) वापरतात पण अनेकांना हे माहीत नसतं किंवा लक्ष देत नाही की कंडोमचीही एक्सपायरी डेट असते. म्हणजे एका कालावधीनंतर कंडोम वापरता येत नाही.

लैंगिक जीवन : एक्सपायर्ड कंडोमचा वापर ठरू शकतो घातक, जाणून घ्या कारण....
Sexual Health : कंडोमचा वापर लोक दोन कारणांसाठी करतात. एकतर अनेकजण याचा वापर गर्भधारणा टाळण्यासाठी करतात. तर काही लोक याचा वापर यौन संक्रमणापासून बचाव करण्यासाठीही कंडोमचा (Expired Condom) वापर करतात. कंडोम वापरण्याची ही दोन मुख्य कारणे आहे. कंडोम लेटेक्स रबरपासून तयार केला जातो. पण अनेकांना हे माहीत नसतं की, कंडोमची सुद्धा एक्सपायरी डेट असते.
कंडोमची एक्सपायरी डेट
अनेकजण कंडोम वापरतात पण अनेकांना हे माहीत नसतं किंवा लक्ष देत नाही की कंडोमचीही एक्सपायरी डेट असते. म्हणजे एका कालावधीनंतर कंडोम वापरता येत नाही. लोक आजही कंडोमबाबत मोकळेपणाने बोलत नाही. म्हणून याचीही कधीही चर्चा होत नाही. त्यामुळे कधीही कंडोम घेताना हे बघा की, ते एक्सपायर्ड तर नाही ना. प्रत्येक कंपनीची एक्सपायरी डेट वेगवेगळी असते. (हे पण वाचा : लैंगिक जीवन : शीघ्रपतन नेमकं कशामुळे होतं? जाणून घ्या कारणे आणि उपाय...)
कधीपर्यंत केला जाऊ शकतो वापर
एक्सपायरी डेटशिवाय कंडोम बनत नाहीत. पण हेही खरं आहे की, काही कंडोम ३-४ वर्षही चालतात. मात्र, कंडोमा वापर करण्याआधी त्याची एक्सपायरी डेट नक्की बघा. सोबतच हेही बघा की, कंडोममध्ये लुब्रिकेशन आहे की नाही. तसेच कंडोम फार जास्त उष्ण ठिकाणी ठेवू नये.
कंडोमची एक्सपायरी डेट जाणून घेणं फार गरजेचं आहे. अनेक लोकांना हा गैरसमज असतो की, कंडोम कितीही दिवस सांभाळून ठेवले तर ते खराब होत नाही. पण असं नसतं. कोणतीही वस्तू ही एक्सपायरी डेटसोबत येत असते. वस्तू तशा टेस्ट करूनच मार्केटमध्ये येत असतात. (हे पण वाचा : लैंगिक जीवन : शारीरिक संबंधानंतर काय विचार करतात पुरूष? तुमच्यासोबतही 'असं' होतं का?)
इन्फेक्शनचा धोका
एक्सपायरी डेट जाणून घेणं यासाठीही गरजेचं आहे कारण जर तुम्ही एक्सपायर्ड कंडोमचा वापर केला तर याने संक्रमण होण्याचा धोका वाढतो. तुम्हाला प्रायव्हेट पार्टसंबंधीही काही समस्या होऊ शकतात. प्रायव्हेट पार्टमध्ये खाजेची समस्याही होऊ शकते. याने तुमच्या पार्टनरलाही समस्या होऊ शकते.