लैंगिक जीवन : शारीरिक संबंध ठेवण्याआधी आणि नंतर 'या' गोष्टी करणं विसरू नका!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 03:59 PM2019-08-28T15:59:58+5:302019-08-28T16:00:04+5:30
अनेक कपल्स शारीरिक संबंधावेळी काहीना काही अशा चुका करतात की, त्या चुकांचा त्यांच्या नात्यावर आणि आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
अनेक कपल्स शारीरिक संबंधावेळी काहीना काही अशा चुका करतात की, त्या चुकांचा त्यांच्या नात्यावर आणि आरोग्यावर वाईट परिणाम होतो. या दोन्ही स्थिती वाईट आहेत. पण अनेकजण शारीरिक संबंधाशी निगडीत समस्यांवर संवादच साधत नाहीत. त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. आज अशाच काही महत्वाच्या गोष्टींबाबत जाणून घेऊ...
पार्टनरची सहमती गरजेची
महिला असो वा पुरूष दोघांसाठी गरजेचं आहे की, शारीरिक संबंधाआधी एकमेकांची सहमती असणं. जास्तीत जास्त लोकांचं असं मत असतं की, केवळ महिलांचीच सहमती असणं गरजेचं आहे. पण महिलांनीही हे समजून घ्यायला पाहिजे की, पुरूषांची सहमतीही आवश्यक आहे.
सुरक्षेची घ्या काळजी
शारीरिक संबंधाआधी लैगिक आजारांपासून बचावासाठी आणि नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी सुरक्षेची आधी काळजी घ्यावी.
फोरप्लेला द्या महत्व
शारीरिक संबंधाची सुरूवात ही फोरप्लेने व्हावी. फोरप्लेच्या माध्यमातून पार्टनरला मानसिक आणि शारिरिक रूपाने तयार केलं तर दोघांनाही परमोच्च आनंद मिळण्यास मदत होईल.
स्वच्छतेची घ्या काळजी
शारीरिक संबंधाआधी आणि नंतर दोन्ही वेळी स्वच्छतेची काळजी घेणं फार गरजेचं आहे. शारीरिक संबंधानंतर आणि आधी प्रायव्हेट पार्टची स्वच्छता करावी. नाही तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन होण्याचा धोका असतो.
लघवीला जावे
तज्ज्ञांचं मत आहे की, शारीरिक संबंधानंतर लगेच लघवीला जावे. जेणेकरून इन्फेक्शनपासून तुमचा वेळीच बचाव होईल.