लैंगिक जीवन : शारीरिक संबंधाशी निगडीत 'या' आजारांची तर तुम्हाला कल्पना देखील नसेल!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2019 03:58 PM2019-10-09T15:58:59+5:302019-10-09T16:02:04+5:30
इरेक्टाइल डिस्फंक्शन, प्रीमच्योर इजॅक्युलेशन, नाइट फॉल लैंगिक संबंधाबाबतच्या अशा समस्या आहेत, ज्याबाबत जास्तीत जास्त लोकांना माहीत असतं.
(Image Credit : life.spectator.co.uk)
इरेक्टाइल डिस्फंक्शन, प्रीमच्योर इजॅक्युलेशन, नाइट फॉल लैंगिक संबंधाबाबतच्या अशा समस्या आहेत, ज्याबाबत जास्तीत जास्त लोकांना माहीत असतं. कारण या फार कॉमन समस्या आहेत आणि या समस्या शारीरिक संबंधाशी निगडीत स्ट्रेसमुळेही होतात. पण असेही अनेक लैंगिक आजार किंवा समस्या आहेत. ज्यांबाबत तुम्हाला माहीत नसेल. चला जाणून घेऊ अशाच काही समस्यांबाबत....
ऑर्गॅस्मिक डिस्फंक्शन
ज्याप्रमाणे इरेक्टाइल डिस्फंक्शनमध्ये पुरूषांना शारीरिक संबंधावेळी इरेक्शन(ताठरता) मिळवण्यास अडचण येते. ठीक त्याप्रमाणेच ऑर्गॅस्मिक डिस्फंक्शनमध्ये व्यक्तीला उत्तेजना तर होते, पण जशीही व्यक्ती परमोच्च सुखापर्यंत पोहोचते, त्यावेळी त्यांना ऑर्गॅज्मचा अनुभव मिळत नाही किंवा मोठ्या मुश्किलीने त्यांना ऑर्गॅज्म होतो. ऑर्गॅज्मसंबंधी ही समस्या महिला आणि पुरूष दोघांमध्येही होऊ शकते.
निमफोमेनिया
याला तुम्ही साध्या शब्दात हायपरसेक्शुअॅलिटी असंही म्हणू शकता. ही एक अशी स्थिती आहे, ज्यात व्यक्तीला प्रत्येक क्षणाला शारीरिक संबंधाची इच्छा होते. निमफोमेनियाची समस्या सामान्यपणे महिलांना होते. आणि अनेकदा तर ही समस्या इतकी वाढते की, या आजाराने पीडित महिला शारीरिक संबंधासाठी प्रमाणापेक्षा जास्त desperate होतात.
सेक्सोमेनिया
हा एक असा आजार आहे ज्यात लोक झोपेत असतानाही शारीरिक संबंध ठेवतात. ही आजार एकप्रकारे झोपेत चालण्यासारखा आजार आहे. यादरम्यान भलेही व्यक्ती झोपेत असेल पण त्यांना हे माहीत असतं की, ते शारीरिक संबंध ठेवत आहेत. निमफोमेनियाप्रमाणेच सेक्सोमेनियाने पीडित व्यक्ती सुद्धा शारीरिक संबंधाबाबत हायपर अॅक्टिव राहतात.
सेक्शुअल ऑर्गॅज्म सिंड्रोम
ऑर्गॅज्मचा अनुभव मिळणं हा एक फारच आनंददायी क्षण असतो. पण दुसऱ्याच मिनिटाला तुम्हाला ऑर्गॅज्मचा अनुभव मिळत असेल तर हे तुमच्यासाठी चिंतेचं कारण ठरू शकतं. जरा विचार करा की, तुम्ही ऑफिसमध्ये सहकाऱ्याशी बोलताय आणि तुम्हाला ऑर्गॅज्म फील होतो, जेवताना असं होतं, आंघोळ करताना, चालताना असं होत असेल तर हा एक आजार आहे. याला सेक्शुअल ऑर्गॅज्म सिंड्रोम असं म्हणतात.