लैंगिक जीवन : दारूने शारीरिक संबंधाची क्षमता वाढते? जाणून घ्या समज-गैरसमज...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2020 03:34 PM2020-03-05T15:34:34+5:302020-03-05T15:36:01+5:30
अनेकांमध्ये असा गैरसमज असतो की, मद्यसेवन केल्यावर शारीरिक संबंधात आणखी उत्साह येतो. त्यामुळे अनेकजण दारूच्या नशेत शारीरिक संबंध ठेवतात.
(Image Credit : haberturk.com)
अनेकांमध्ये असा गैरसमज असतो की, मद्यसेवन केल्यावर शारीरिक संबंधात आणखी उत्साह येतो. त्यामुळे अनेकजण दारूच्या नशेत शारीरिक संबंध ठेवतात. पण असं करणं फायदेशीर आहे की नुकसानकारक हे अनेकांना माहितीच नसतं किंवा असं म्हणुया की याचा फार कुणी विचारच करत नाहीत. मग त्यांना ते महागात पडतं. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला दारू पिऊन शारीरिक संबंध ठेवल्याने शरीरावर आणि तुमच्या लैंगिक जीवनावर काय परिणाम होतो हे सांगणार आहोत.
एका रिसर्चनुसार, मद्यसेवन केल्यावर अर्थातच शरीरात ऊर्जा वाढते. मात्र, अल्कोहोलमुळ शरीरातील रक्तप्रवाह सुद्धा वाढतो. तसेच अल्कोहोलमधील अॅन्जिओटेन्सिन नावाच्या हार्मोन्सचं प्रमाणही वाढतं. इतकेच नाही तर मद्यसेवन करून शारीरिक संबंध ठेवले तर ऑर्गॅज्मआधीच इजॅक्यूलेशन होण्याची शक्यता अधिक असते. तसेच इजॅक्यूलेशन उशीरानेही होऊ शकतं.
हेच कारण आहे की, मद्यपान करणाऱ्यांची शारीरिक संबंधानंतरही संतुष्टी होत नाही. त्यांना ऑर्गॅज्म होण्यासही साधारण ३० मिनिटांचा वेळ लागू शकतो. अशात पार्टनरला त्रास किंवा वेदना होण्याची शक्यता अधिक असते. अशावेळ जबरदस्ती केली तर तुमचं नातं आणि लैंगिक जीवन धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
काही महिलांना मद्यपान केल्यावर शारीरिक संबंध ठेवणं आवडतं. कारण जास्त वेळ क्रिया चालत असल्याने त्यांना आनंद मिळतो. पण ही वेळ वाढली तर त्यांना त्रास होऊ शकतो. नशेत जास्त जोर लावला गेला तर प्रायव्हेट पार्टला इजा आणि इन्फेक्शनचा धोका देखील होऊ शकतो.
या कारणांमुळे मद्यपान करून शारीरिक संबंध ठेवणं महागात पडू शकतं. म्हणजे एकतर त्यातून तुम्हाला हवा तो आनंद मिळत नाही. दुसरं म्हणजे तुमच्या पार्टनरला त्रास होऊ शकतो आणि तिसरं म्हणजे तुमचं नातं अडचणीत येऊ शकतं. त्यामुळे मद्यपान करून शारीरिक संबंध ठेवणं टाळलं पाहिजे.