लैंगिक जीवन : शीघ्रपतनाची समस्या झटपट दूर करण्याचे खास फंडे!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2020 04:26 PM2020-02-01T16:26:48+5:302020-02-01T16:27:32+5:30
याहूनही मोठी समस्या ही आहे लोक याबाबत काही बोलत नाहीत आणि आतल्या आतल्या त्याबाबत विचार करून झुरत राहतात.
शीघ्रपतन या समस्येचा सामना जास्तीत जास्त पुरूषांना कधी ना कधी करावाच लागतो. पण याहूनही मोठी समस्या ही आहे लोक याबाबत काही बोलत नाहीत आणि आतल्या आतल्या त्याबाबत विचार करून झुरत राहतात. एका सर्व्हेनुसार, तीनपैकी एक व्यक्तीला शीघ्रपतनाची समस्या असते. जर तुम्हाला सुद्धा ही समस्या असेल तर ही माहिती तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. वेगवेगळे उपाय आधीच करून झाले असतील आणि ही समस्या जास्त असेल तर जराही वेळ न घालवता आधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
शीघ्रपतनाची समस्या कुणालाही होऊ शकते. तसेच याची कारणेही वेगवेगळी असतात. व्यक्तीनुसार ही कारणे बदलतात. त्यात अतिघाई करणे, प्रायव्हेट पार्ट अति संवेदनशील असणे, चुकीचा आहार घेणे, केवळ विचार करूनच संतुष्टी मिळणे अशी वेगवेगळी कारणे आहेत.
१) अनेक तज्ज्ञ याबाबत वेगवेगळे सल्ले देतात. काही तज्ज्ञ सांगतात की, शीघ्रपतानाची समस्या तात्पुरती दूर करायची असेल तर शारीरिक संबंधा ठेवायच्या दोन तास आधी हस्तमैथुन करा. हस्तमैथुन ही एक नैसर्गिक क्रिया आहे. यात काहीही गैर नाही. शारीरिक संबंध ठेवण्याआधी हस्तमैथुन केलं तर बेडवर तुम्ही जास्तवेळ टिकून रहाल.
२) अनेकजण इंटरकोर्सची घाई करतात आणि त्यामुळे ते जास्त वेळ बेडवर तग धरून राहू शकत नाही. अशावेळी घाई करू नका. ना तुमची पार्टनर पळून जाणार आहे ना तुम्हाला कुठं जायचं आहे. त्यामुळे थेट इंटरकोर्सकडे न वळता आधी १५ ते २० मिनिटे फोरप्ले करण्याला वेळ द्या. याने तुम्ही शीघ्रपतनाची समस्या कंट्रोल करू शकाल. तसेच तुमच्या पार्टनरला संतुष्ट करू शकाल.
३) कीगल एक्सरसाइज ही या समस्येपासून सुटका मिळवण्याची सर्वात बेस्ट एक्सरसाइज आहे. याचा फायदा महिलांनाही होतो. याने ओटीपोटाजवळील मसल्स मजबूत होण्यास मदत मिळते आणि तुमचा परफॉर्मन्स वेळ सुधारतो. तसेच या एक्सरसाइजने ऑर्गॅज्मचा अनुभव होण्यासही मदत मिळते. नियमितपणे ही एक्सरसाइज करून तुम्ही शीघ्रपतनाची समस्या दूर करू शकता.
४) अनेकदा तज्ज्ञ सांगतात की, शारीरिक संबंधावेळी ऐनवेळेला स्वत:वर कंट्रोल ठेवून क्रिया थांबवा. काही सेकंद थांबून पुन्हा इंटरकोर्स करू शकता. अशी क्रिया काही वेळ ब्रेक घेत करू शकता. याने तुमची शीघ्रपतनाची समस्या कंट्रोल करता येऊ शकते.