लैंगिक जीवन : मनात सतत शारीरिक संबंधाचेच विचार येत राहतात, ही समस्या आहे का?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2020 03:25 PM2020-03-04T15:25:30+5:302020-03-04T15:31:40+5:30
म्हणजे पुरूषाने जर एखाद्या आकर्षक महिलेकडे पाहिले तर ते उत्तेजित होतात. हीच गोष्ट महिलांसोबतही होते.
(Image Credit : toddcreager.com)
लैंगिक जीवनात इतक्या वेगवेगळ्या समस्या असतात. पण लोक त्यांकडे दुर्लक्ष करतात. यातील एक समस्या म्हणजे काही लोकांच्या मनात सतत शारीरिक संबंधाबाबत विचार सुरू असतात. म्हणजे पुरूषाने जर एखाद्या आकर्षक महिलेकडे पाहिले तर ते उत्तेजित होतात. हीच गोष्ट महिलांसोबतही होते. आता ही बाब डॉक्टरांना सांगण्यातही अडचण येते. त्यामुळे काही समस्या असेल तर अधिक वाढेल. या समस्येबाबत लोकांना फार भीती वाटते. पण खरंच याची भीती वाटण्याची गरज आहे का?
यावर तज्ज्ञ सांगतात की, एखाद्या व्यक्तीबाबत सेक्शुअल विचार येणे ही एक स्वाभाविक प्रक्रिया आहे. पण दुसरं काहीच सुचत नसेल तर ही समस्या गंभीर असू शकते. सामान्यपणे दुसऱ्या व्यक्तींबाबत तुमच्या मनात असे विचार येण्याची वेगवेगळी कारणे असू शकतात. जसे की, पार्टनरची तुम्हाला साथ नसणे, दोघे सेक्शुअल लाइफ एन्जॉय न करू शकणे, गरज असेल तेव्हा पार्टनर जवळ नसणे, शारीरिक संबंधाबाबत दोघांमध्ये मतभेद असणे. पण ही एक सामान्य प्रक्रिया असून ही पुरूष आणि महिला दोघांमध्येही बघायला मिळते.
मात्र, अशाप्रकारचे विचार रोखू न शकणे किंवा याप्रकारचा मनोग्रस्त स्वभाव असणे जसे की, पुरूषांचे किंवा महिलांचे गुप्तांग बघणे किंवा हस्तमैथुन करणे हे दर्शवतात की, तुम्ही एका असामान्य प्रक्रियेतून जात आहात. अशात वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.