लैंगिक जीवन : जर पॉर्न बघून हस्तमैथुन करत असाल तर 'हे' वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2019 03:38 PM2019-11-04T15:38:32+5:302019-11-04T15:39:04+5:30

हस्तमैथुन ही एक सामान्य आणि नैसर्गिक प्रक्रिया आहे. हस्तमैथुन नियंत्रितपणे केला गेला तर याला चांगलं मानलं जातं.

Sex Life : If you masturbate watching porn you should know these facts | लैंगिक जीवन : जर पॉर्न बघून हस्तमैथुन करत असाल तर 'हे' वाचा!

लैंगिक जीवन : जर पॉर्न बघून हस्तमैथुन करत असाल तर 'हे' वाचा!

googlenewsNext

(Image Credit : metro.co.uk)

हस्तमैथुन ही एक सामान्य आणि नैसर्गिक प्रक्रिया आहे. हस्तमैथुन नियंत्रितपणे केला गेला तर याला चांगलं मानलं जातं. पण जर तुम्ही हस्तमैथुन करण्यासाठी पॉर्नवर डिपेंड राहत असाल तर काही गोष्टी जाणून घेणं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. सर्वातआधी तर पॉर्नबाबत तुमचा दृष्टीकोन सामान्य असला पाहिजे. कारण याने तुमचं संपूर्ण जीवन प्रभावित होऊ शकतं. 

पॉर्न बघण्याची सवय जर कंट्रोल बाहेर गेली तर स्थिती आणखी वाईट होऊ शकते. पॉर्न अॅडिक्शन फार कॉमन बाब आहे. कारण पॉर्न अलिकडे फारच सहजपणे उपलब्ध होतात. त्यामुळे कुणालाही याचं अॅडिक्शन लागू शकतं. बरं हे त्या व्यक्तीच्या लक्षातही येत नाही. त्यामुळे पॉर्न बघून हस्तमैथुन करत असाल तर खालील काही गोष्टींचा विचार करणे गरजेचं आहे. 

पॉर्न न बघता हस्तमैथुन करता येतं का?

जर यावर तुमचं उत्तर नाही असं असेल तर तुम्ही तुमच्या शरीराला एखाद्या खास सेक्शुअल कल्पनेसाठी रिस्पॉन्ड करणं शिकवत आहात. अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, उत्तेजना वाढवण्यासाठी पॉर्नवर अवलंबून राहणाऱ्या लोकांना प्रत्यक्षात त्यावेळी उत्तेजित होण्यास अडचण येते. त्यामुळे तुमचं रूटीन बदला आणि हस्तमैथुनासाठी पॉर्नवर अवलंबून राहू नका.

पॉर्नमुळे रिअल लाइफकडे दुर्लक्ष होतं?

जर याचं उत्तर हो असेल तर खऱ्या आयुष्यातील समस्या निपटवण्यासाठी पॉर्न बघणं ही एक पद्धत बनत आहे. जर तुम्ही एक्सायटमेंटसाठी पॉर्न बघत असाल ठीक आहे. पण जर आयुष्यातील काही अडचणी आल्यावर पॉर्न बघत असाल तर हे चुकीचं आहे. तुम्ही पॉर्न बघण्याऐवजी जीवनातील समस्या सोडवण्यासाठी उपाय शोधायला पाहिजे. 

रिअल लाइफमध्येही पॉर्नसारखं करण्याचा विचार करता?

जर याचं उत्तर हो असेल तर ही चिंतेची बाब आहे. पॉर्न व्हिडीओतून छोटया ट्रिक्स शिकणे वाईट नाही. पण खऱ्या आयुष्यात असं काही करण्याचा विचार अजिबात करू नका. कारण तुम्ही जे बघता ते सगळं स्क्रीप्टेड असतं. यात बरीच एडिटिंग असते आणि मॉडल्सना आकर्षक दाखवण्यासाठी मोठी मेहनत केली जाते. ते केवळ काल्पनिक सिनेमे असतात. 

सेफ्टीमध्ये कमी आनंद मिळतो असं वाटतं का?

पॉर्न सिनेमात मॉडल्सना सेफ्टी वापरताना दाखवलं जात नाही. त्यामुळे अनेकांना हे बघताना असं वाटत असेल की, सेफ्टी वापरल्याने कमी आनंद मिळतो. पण मुळात समोरच्या व्यक्तीची मर्जी आणि सेफ्टी फार महत्वाची आहे. त्यामुळे या व्हिडीओजना केवळ मनोरंजन इथपर्यंतच मर्यादित ठेवा.


Web Title: Sex Life : If you masturbate watching porn you should know these facts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.