लैंगिक जीवन : पुरूषांनाच माहीत नसतात Male Orgasm शी संबंधित 'या' गोष्टी!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2019 03:52 PM2019-10-08T15:52:46+5:302019-10-08T15:55:01+5:30
शारीरिक संबंधादरम्यान फार कमी महिलांना ऑर्गॅज्मचा आनंद मिळतो, पण पुरूषांबाबत असं होत नाही. सर्वच पुरूषांना ऑर्गॅज्मचा अनुभव येतो.
शारीरिक संबंधादरम्यान फार कमी महिलांना ऑर्गॅज्मचा आनंद मिळतो, पण पुरूषांबाबत असं होत नाही. सर्वच पुरूषांना ऑर्गॅज्मचा अनुभव येतो. आणि याला कुणी रोखूही शकत नाही. मात्र, इंटरनेट आणि बातम्यांमध्ये केवळ महिलांच्या ऑर्गॅज्मच्या चर्चा होत राहतात. पुरूषांच्या ऑर्गॅज्मवर कुणी फारसं लक्षच देत नाहीत. चला जाणून घेऊन पुरूषांच्या ऑर्गॅज्मबाबत काही खास गोष्टी...
पुरूषांमध्येही असतो G-Spot
ज्याप्रमाणे महिलांमध्ये G-Spot, A-Spot आणि डीप स्पॉट असतात, तसेच पुरूषांमध्येही तीन स्पॉट्स असतात. जे त्यांना उत्तेजित करतात. हे पार्ट्स असतात गुप्तांगाच्या वरच्या भागातील टिश्यूज, perineum (स्क्रॉटम आणि ऐनसच्या मधील भाग) आणि तिसरा प्रॉस्टेट ग्लॅंड पुरूषांना उत्तेजित करणारे पॉइंट्स असतात. यातील प्रॉस्टेट सर्वात जास्त उत्तेजित करतो.
उत्तेजित झाल्यावर इज्यॅक्युलेशन गरजेचं
या प्रक्रियेला एक सायन्टिफिक टर्म इजॅक्युलेटरी इनेव्हिटेबिलिटी असं म्हणतात. याचा अर्थ असा आहे की, एक पुरूष एकदा उत्तेजित झाला तर एका पॉइंटपर्यंत पोहोचल्यानंतर ऑर्गॅज्मपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. पुरूषांचा ऑर्गॅज्म ५ सेकंद ते २२ सेकंदांपर्यंत चालतो. तेच महिलांमध्ये हा कालावधी १३ ते ५१ सेकंदाचा असतो.
ऑर्गॅज्मचा अर्थ इजॅक्युलेशन नाही
काही पुरूष असेही असतात की, जे सीमेन विनाच क्लायमॅक्सपर्यंत पोहोचतात. त्यांना ड्राय ऑर्गॅज्म होऊ शकतो. म्हणजे यात वीर्य बाहेर येत नाही. तसेच एकंदर सांगायचं तर पुरूष ५० लिटर स्पर्म आणि संपूर्ण लाइफटाइममध्ये १४ गॅलन्स सीमेन रिलीज करतात.