लैंगिक जीवन : दिवसातून एकापेक्षा जास्त वेळ संबंध ठेवणं नुकसानकारक आहे का?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2020 03:58 PM2020-03-09T15:58:27+5:302020-03-09T16:02:29+5:30
काय दिवसातून एकापेक्षा जास्त वेळ शारीरिक संबंध ठेवणं नुकसानकारक आहे?
(Image Credit : independent.co.uk)
१) प्रश्न - मी ३१ वर्षांची आहे आणि लवकरच माझं लग्न होणार आहे. बऱ्याच वर्षांपासून शारीरिक संबंधाबाबत माझ्या मनात एक प्रश्न होता. दिवसातून कितीवेळा शारीरिक संबंध ठेवणं योग्य ठरेल? काय दिवसातून एकापेक्षा जास्त वेळ शारीरिक संबंध ठेवणं नुकसानकारक आहे?
(Image Credit : dailymail.co.uk)
उत्तर - मुळात तुमची जेवढ्या वेळेस इच्छा होईल तितक्यांदा तुम्ही दिवसभरात शारीरिक संबंध ठेवू शकता. मात्र, यात दोघांचीही सहमती असावी. दिवसातून एकापेक्षा जास्त वेळ शारीरिक संबंध ठेवणं अजिबात अनहेल्दी नाही. अर्थातच यादरम्यान तुम्ही तुमचा कॉमन सेन्स वापराल.
मुळात दिवसभरात किती वेळ शारीरिक संबंध ठेवायचे हे दोन्ही व्यक्तींच्या इच्छेवर, त्यांच्या क्षमतेवर आणि परिस्थितीवर अवलंबून आहे. जर तुमचं शरीर किंवा पार्टनर एकापेक्षा जास्त वेळ शारीरिक संबंधासाठी तयार नसेल तर जबरदस्ती करू नये. कारण कोणती जास्तीत जास्त वेळ शारीरिक संबंध ठेवण्याची स्पर्धा सुरू नाही. त्यातून तुम्हाला आनंद मिळवायचा असतो.
२) प्रश्न - नुकताच मी पत्नीसोबत सुट्टी एन्जॉय करायला गेलो होतो. मला फारच आश्चर्य वाटलं जेव्हा मी तिच्या फोनमध्ये पाहिलं की, तिने खूपसारे स्क्वर्ट व्हिडीओ डाऊनलोड केले होते. जेणेकरून दोघेही एन्जॉय करू शकू. आम्ही सुट्टीदरम्यान दिवसातून २ ते ३ वेळा शारीरिक संबंध ठेवले. पण तिला एकदाही स्क्वर्टचा अनुभव झाला नाही. असं का?
उत्तर - मला वाटतं शारीरिक संबंधातून दोघांनाही आनंद मिळणं हा महत्वाचा मुद्दा ना की, स्क्वर्ट. तुम्ही तुमच्या फोरप्लेच्या टेक्निक सुधारा. नियमित वॉकिंग आणि एक्सरसाइजची सुरूवातही करा. हवं तर सेक्सॉलॉजिस्टची मदत घ्या. त्यांचीही तुम्हाला मदत होऊ शकते.