लैंगिक जीवन : संबंधानंतरही संतुष्टी न मिळाल्यास काय होतो महिलांवर प्रभाव?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 03:54 PM2019-12-23T15:54:20+5:302019-12-23T15:59:55+5:30
काही लोकांना प्रश्न पडतो की, पार्टनर संतुष्ट नाही हे कसं ओळखावं किंवा जाणून घ्यावं. यावर थेट बोलावं कसं असाही अनेकांना प्रश्न पडतो.
काही लोकांना प्रश्न पडतो की, पार्टनर संतुष्ट नाही हे कसं ओळखावं किंवा जाणून घ्यावं. यावर थेट बोलावं कसं असाही अनेकांना प्रश्न पडतो. पण मुळात पार्टनर संतुष्ट आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी त्यावर बोलणं हा एकच मार्ग नाही. अर्थात बोलून सुद्धा जाणून घेता येऊ शकतं. पण जर त्यावर बोलता येत नसेल तर आणखीही काही संकेत आहेत ज्यावरून तुम्ही याचा अंदाज घेऊ शकता. आणि त्यानुसार समस्या दूर करण्यावर काम करू शकता.
मानसिक आणि भावनात्मक गरज
शारीरिक संबंधाने व्यक्तीची केवळ शारीरिकच नाही तर भावनिक गरजही पूर्ण होत असते. सामान्यपणे ही समस्या महिलांसोबत अधिक होते. त्यात ही समस्या पार्टनरकडे बोलून कशी दाखवायची ही सुद्धा अडचण असते. अशावेळी पुरूष जोडीदाराची योग्य माहिती घेणं ही जबाबदारी असते.
काय असतो फरक?
सेक्शुअल लाइफमध्ये सगळं चांगलं असणं किंवा नसणं या दोन्ही स्थितींचा प्रभाव पार्टनर्सच्या बॉंडिंगवर पडतो. सोबतच मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. महिलांबाबत सांगायचं तर त्यांना तणाव, चिंता, डिप्रेशन, लठ्ठपणा आणि थायरॉइड सारख्या समस्या होऊ शकतात. जर महिलांना अशाप्रकारच्या समस्या झाल्या तर त्यांना पुढे गर्भधारणेतही समस्या निर्माण होऊ शकते.
वेदना अधिक होतात
तज्ज्ञ सांगतात की, असं जर असेल की, महिला सेक्शुअल अॅक्टनंतरही संतुष्ट होत नसतील तर त्यांना दुसऱ्यांदा संबंध ठेवताना वेदना अधिक जाणवू शकतात. वेगवेगळ्या केसेसमध्ये याची शारीरिक आणि मानसिक वेगवेगळी कारणे असू शकतात.
उत्तेजना होते कमी
ज्या महिलांना संतुष्टी जाणवत नसेल त्यांना फोरप्ले दरम्यान उत्तेजनासंबंधी समस्यांचा सामना करावा लागू शकतो. अशा महिलांमध्ये शारीरिक संबंधाबाबत इच्छा कमी झालेली बघायला मिळते किंवा पूर्णपणे इच्छा नष्ट झालेली बघायला मिळते. अशात त्यांच्या पार्टनरला वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
पार्टनरची साथ नसणं
ज्या महिलांना शारीरिक संबंधानंतरही संतुष्टीची जाणीव होत नाही, त्या दुसऱ्यांना पार्टनरसोबत शारीरिक संबंध एन्जॉय करू शकत नाहीत. आणि पुरूष पार्टनर ही बाब लगेच समजू शकतात. अशात वेळीच संवादाने किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेऊन यावर उपाय केला जाऊ शकतो.