लैंगिक जीवन : 'या' वयात महिलांना संबंधावेळी येतात सर्वात जास्त अडचणी!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2019 03:59 PM2019-11-21T15:59:53+5:302019-11-21T16:01:09+5:30
सामान्यपणे पुरूषांच्या तुलनेत महिलांना यूरिन इन्फेक्शन फार जास्त होतं. यूटीआय इन्फेक्शन हे महिलांनाच जास्त होतं.
सामान्यपणे पुरूषांच्या तुलनेत महिलांना यूरिन इन्फेक्शन फार जास्त होतं. यूटीआय इन्फेक्शन हे महिलांनाच जास्त होतं. असं होण्यामागे बायॉलॉजिकल आणि फिजिकल कारणे असतात. या इन्फेक्शनचा त्यांच्या सेक्शुअल लाइफवर फार प्रभाव पडतो. पण एका खास वयात आल्यावर महिलांना सेक्शुअल हेल्थ संबंधी वेगवेगळ्या समस्यांचा जास्त सामना करावा लागतो.
काय कारण असतं?
महिलांची सेक्शुअल लाइफ विस्कळीत होण्याचं सर्वात कॉमन आणि मुख्य कारणे म्हणजे यूरिन इन्फेक्शन, व्हजायनल ड्रायनेस, ऑर्गॅज्म न होणं किंवा उत्तेजना कमी असणं ही आहेत. यातील खास बाब ही आहे की, या सर्वच समस्यांचा संबंध कुठेना कुठे एकमेकांशी असतो.
'या' वयात होतात जास्त अडचणी
सामान्यपणे महिलांना ४० ते ५५ वयादरम्यान सेक्शुअल हेल्थसंबंधी वेगवेगळ्या समस्या सर्वाधिक होतात. ही बाब नुकत्याच करण्यात आलेल्या इटलीतील एका रिसर्चमधून ही बाब समोर आली आहे.
४० ते ५५ वयाच्या महिलांमध्ये शारीरिक संबंधाची इच्छा कमी होण्याचं मुख्य कारण म्हणून मेनोपॉजशी निगडीत समस्या समोर आल्या आहेत. ज्याच्या प्राथमिक लक्षणांमध्ये व्हजायनल ड्रायनेस, इरिटेशन आणि उत्तेजनेची कमतरता जाणवते. ही लक्षणे प्रत्येक दुसऱ्या महिलासोबत वेगळी असू शकतात.
ओवेरियन कर्व्स आणि हार्मोन
मेनोपॉज एक अशी प्रक्रिया आहे ज्यात महिलांना होणारे पीरियड्स बंद होतात. त्यामुळे त्यांच्या फीमेल हार्मोन एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन तयार होणं बंद होतात. याकारणाने महिलांना सेक्शुअल लाइफशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो.
'या' महिलांना सर्वात जास्त होतात समस्या
रिसर्चनुसार, सेक्शुअल हेल्थशी संबधित समस्या सर्वाधिक त्या महिलांना होतात, ज्याना स्मोकिंगची, ड्रिंकची सवय असते. तसेच ज्यांचं वजन जास्त असतं. ज्यांना शारीरिक काहीतरी समस्या असतात.
असंही होतं
मेनोपॉजदरम्यान इंटरकोर्स पेनफुल होऊ शकतो. बॅक्टेरिअल इन्फेक्शन होऊ शकतं, मूड स्विंग्स, जॉइंट्समधे वेदना आणि झोप न येणे यांसारख्या समस्या होतात. पण ताज्या रिसर्चनुसार, उडीन विश्वविद्यालयातील डॉक्टर एंग्लो कॅगनेसी यांच्यानुसार, टक्केवारीनुसार महिलांमध्ये सेक्शुअल हेल्थशी संबंधित सर्वाधिक समस्या सरासरी ४९ या वयात होतात. यात महिलांचं बॉडी मास इंडेक्सही महत्वाचं असतं.